जाहिरात

IND vs AUS: गाबाचे त्रिदेव टीम इंडियाला पावणार का? कधी आणि कुठे पाहणार तिसरी टेस्ट?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी टेस्ट मॅच शनिवारपासून (14 डिसेंबर) ब्रिस्बेन येथे होणार आहे. जाणून घ्या कधी आणि कुठे पहायला मिळणार तिसऱ्या टेस्ट मॅचची लाईव्ह स्ट्रीमिंग?

IND vs AUS: गाबाचे त्रिदेव टीम इंडियाला पावणार का? कधी आणि कुठे पाहणार तिसरी टेस्ट?
मुंबई:

मानसी पिंगळे, प्रतिनिधी

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील बॉर्डर -गावस्कर ट्रॉफी  (Border Gavaskar Trophy) सध्या रंगतदार स्थितीमध्ये आहे. या सीरिजमधील पर्थमध्ये झालेली पहिली टेस्ट भारतीय टीमनं 295 रन्सच्या फरकानं दणदणीत जिंकली होती. पण, ॲडलेडमधील पिंक-बॉल टेस्टमध्ये यजमान टीमनं 10 विकेट्सनं विजय मिळवत सीरिजमध्ये कमबॅक केलं. सध्या दोन्ही टीम 1-1 नं बरोबरीत आहेत. त्यामुळे शनिवारपासून (14 डिसेंबर) ब्रिस्बेनमध्ये सुरु होणाऱ्या तिसऱ्या टेस्टला महत्त्व आलंय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ब्रिस्बेनमधील गाबा स्टेडियमची भारतीय फॅन्ससाठी एक सुखद आठवण आहे. यापूर्वी 2021 मध्ये भारतानं इथं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली होती. 1988 नंतर पहिल्यांदाच गाबामध्ये ऑस्ट्रेलियाला एखाद्या टीमनं टेस्ट मॅचमध्ये पराभूत केलं होतं. 'टूटा है गाबा का घमंड' हा वाक्यप्रचार त्यानंतरच क्रिकेट विश्वात रुढ झाला.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी टीम इंडियाला आता उर्वरित तीन्ही टेस्टमध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे. या विजयाची सुरुवात करण्यासाठी गाबामधील ही आठवण भारतीय 
टीमला प्रेरणा देणारी आहे. ऋषभ पंत, शुबमन गिल आणि मोहम्मद सिराज हे चार वर्षांपूर्वीच्या विजयाचे हिरो शनिवारी देखील मेैदानात उतरतील. भारताच्या विजयासाठी या तिघांसह संपूर्ण टीमनं कामगिरी उंचावण्याची गरज आहे. 

क्रिकेट, हॉकी आणि बुद्धिबळ, भारताच्या यशामागचं दक्षिण आफ्रिका कनेक्शन माहिती आहे का?

(नक्की वाचा: क्रिकेट, हॉकी आणि बुद्धिबळ, भारताच्या यशामागचं दक्षिण आफ्रिका कनेक्शन माहिती आहे का?)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी टेस्ट कधी सुरु होणार?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या तिसरी टेस्ट 14 ते 18 डिसेंबर दरम्यान खेळली जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी खेळ सुरु होईल. या मॅचचा टॉस पहिल्या दिवशी 5 वाजून 20 मिनिटांनी होईल.

कुठे पाहाता येणार मॅच?

या मॅचचं थेट प्रक्षेपण भारतामध्ये स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर करण्यात येणार आहे. तर डिस्नी+ हॉटस्टार अ‍ॅपवर ही मॅच ऑनलाईन पाहता येईल. या मॅचचा अपडेट स्कोअर आणि विश्लेषण तुम्हाला ' NDTV मराठी' च्या वेबसाईटवरही पाहता येईल.

'एक शब्दही बोलला नाही...' धोनीला कॅप्टनपदावरुन काढण्यावर गोयंकांनी सोडलं मौन

(नक्की वाचा: 'एक शब्दही बोलला नाही...' धोनीला कॅप्टनपदावरुन काढण्यावर गोयंकांनी सोडलं मौन)

टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11

ब्रिस्बेबनमधील पिच हे सामान्यपणे फास्ट बॉलर्सना मदत करतं. त्यामुळे या टेस्टमध्ये आर. अश्विनच्या जागी आकाशदीपचा समावेश केला जाऊ शकतो. त्याचबरोबर गाबातील चार वर्षांपूर्वीचा आणखी एक हिरो वॉशिंग्टन सुंदरला तिसऱ्या टेस्टमध्ये स्थान मिळणार का? याकडंही सर्वांचं लक्ष लागलंय.

टीम इंडियाची संभाव्य 11 : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल , शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, रोहित शर्मा (कॅप्टन), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर/ आकाशदीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज , हर्षित राणा.
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com