
IPL 2025 : भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान आयपील 2025 रद्द होणार का? की इतर कोणत्या देशात शिफ्ट केलं जाणार? असा सवाल केला जात आहे. काल गुरुवारी हिमाचल प्रदेशच्या धर्मशाला स्टेडियममध्ये पंजाब आणि दिल्ली यांच्या सुरु असलेला सामना रद्द करण्यात आला. 10.1 षटकांचा खेळ झाला असताना हा सामना रद्द करण्यात आला. खेळाडू आणि प्रंक्षकांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता असल्याची प्रतिक्रिया बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आयपीएलचे चेअरमन अरुण धुमल म्हणाले की, सध्याच्या परिस्थिती आयपीएल लीग सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्याआधी आम्ही सरकारच्या निर्देशांची वाट पाहत आहोत. जम्मू आणि पठाणकोट या जवळच्या शहरांमध्ये हवाई हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर धर्मशाले सुरु असलेला पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना रद्द करण्यात आला. त्यानंतर आयपीएल सुरू राहण्याबाबत शंका कायम आहेत.
(नक्की वाचा- IPL 2025 : पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स मॅच रद्द! धरमशालामध्ये सुरु होता सामना)
'द इंडियन एक्सप्रेस'च्या वृत्तानुसार, भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान बीसीसीआयने आयपीएलच्या 18 व्या हंगामासाठी आपले सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. ज्यामध्ये स्पर्धेच्या वेळापत्रकात सुधारणा करण्यापासून ते लीग थांबवण्यापर्यंतच्या परवानगीचा समावेश आहे.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी म्हटलं की, आम्ही सध्याच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. या मुद्द्यावर बोर्ड सरकारकडून सल्ला घेत आहे. आयपीएलबाबतचा अंतिम निर्णय आज घेतला जाईल. आम्हाला जे काही सांगितले जाईल आम्ही ते करू.
( नक्की वाचा : Big News : पाकिस्तानचे ड्रोन हल्ले भारतानं परतवला, जम्मू ते जैसलमेरपर्यंत चोख उत्तर )
दिल्ली आणि पंजाबच्या खेळाडूंना रस्तेमार्गाने दिल्लीला आणणार
दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जच्या सर्व खेळाडूंना धर्मशालेहून दिल्लीला पाठवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याची माहिती होती. मात्र आता पंजाब आणि दिल्लीच्या खेळाडूंना ट्रेनऐवजी रस्तेमार्गाने दिल्लीला आणले जाणार असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने दिल्लीला आणण्याची परवानगी देण्यात आली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world