जाहिरात

U19 WC 2025: भारताच्या लेकी दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन! दक्षिण आफ्रिकेला धुळ चारत जिंकला T20 वर्ल्डकप

आफ्रिकेने टीम इंडियाला विजयासाठी 83 धावांचं लक्ष दिले होतं. टीम इंडियाने हे आव्हान 1 विकेट गमावून 11.2 ओव्हरमध्ये पूर्ण केले. याआधी शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने पहिला विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला होता. 

U19 WC 2025: भारताच्या लेकी दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन! दक्षिण आफ्रिकेला धुळ चारत जिंकला T20 वर्ल्डकप

U19 Womens World Cup:  क्रिडाविश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय महिलांच्या 19 वर्षाखालील संघाने सलग दुसऱ्यांदा टी- ट्वेंटी विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. टी ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सनी दारुण पराभव केला. आफ्रिकेने टीम इंडियाला विजयासाठी 83 धावांचं लक्ष दिले होतं. टीम इंडियाने हे आव्हान 1 विकेट गमावून 11.2 ओव्हरमध्ये पूर्ण केले. याआधी शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने पहिला विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला होता. 

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांची सुरुवात काही खास झाली आहे. आफ्रिकेचा संपूर्ण संघ 20 षटकांत फक्त 82 धावा करून सर्वबाद झाला. यामध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी मिके व्हॅन वुर्स्टने सर्वाधिक 23 धावा केल्या. त्यांच्याशिवाय, जेम्मा बोथा यांनी 16 आणि फेय काउलिंग यांनी 15 धावा केल्या.

दुसरीकडे, भारताकडून गोंगडी त्रिशाने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. गोंगडी त्रिशाने 4 षटकांत फक्त 15 धावा दिल्या आणि 3 विकेट्स घेतल्या. त्यांच्याशिवाय वैष्णवी शर्मा, आयुषी शुक्ला आणि पारुनिका सिसोदिया यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. शबनम शकीलनेही एका फलंदाजाची विकेट घेण्यात यश मिळवले.

नक्की वाचा - New Year 2025 Festivals And Important Days: 2025मधील सणउत्सव आणि दिनविशेषांची संपूर्ण यादी पाहा एका क्लिकवर

2025 च्या अंडर 19 महिला टी-20 विश्वचषकात टीम इंडियाने एकतर्फी सामने जिंकले. त्यांनी वेस्ट इंडिजचा 9 गडी राखून पराभव करून सुरुवात केली. यानंतर, भारतीय संघाने मलेशियाचा 10 विकेट्सने पराभव केला आणि नंतर श्रीलंकेचा 60 धावांनी पराभव केला. त्याच वेळी, त्यांनी बांगलादेशविरुद्ध 8 विकेट्सने आणि स्कॉटलंडविरुद्ध 150 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी उपांत्य फेरीत इंग्लंडचा 9 विकेट्सने पराभव केला आणि अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. आता आम्ही अंतिम सामनाही सहज जिंकला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: