Jemimah Rodrigues Brand Value : भारतीय महिला क्रिकेट टीमने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत ५२ धावांनी पराभव करीत आपला पहिला ICC महिला वनडे वर्ल्ड कप पटकावला आहे. नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये भारतीय महिला टीमला घवघवीत यश मिळालं.
२००५ आणि २०१७ च्या अंतिम सामन्यात अपयश आल्यानंतर २०२५ मध्ये मिळालेलं यश पाहून प्रत्येक भारतीय भावुक झाला होता. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीमने जबरदस्त वापसी केली आणि इतिहास रचला. या यशानंतर खेळाडूंची Brand Value आणि स्पॉन्सरशिपमध्ये मोठी वाढ झाली आहे. ज्यामध्ये सर्वाधिक फायदा जेमिमा रोड्रिग्सला झाला आहे.
Jemimah Rodrigues च्या Brand Value मध्ये १०० टक्के वाढ
द इकॉनॉमिक टाइम्समधील वृत्तानुसार, भारतीय महिला क्रिकेटरपैकी जेमिमा रोड्रिग्सच्या Brand Value मध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. तिच्या ब्रँड फीमध्येही १०० टक्क्यांपर्यंत वाढ पाहायला मिळत आहे.
आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरोधात तिने नाबाद १२७ धावा घेतल्या. तिच्या या कामगिरीने अनेक कंपन्यांचं लक्ष वेधलं. यानंतर जेमिमाला अनेक ब्रँड्स कडून ऑफर येत आहेत.
नक्की वाचा - PM Modi Meets Team India : खट्याळ हरलीनचा पीएम मोदींना हटके प्रश्न अन् हॉलमध्ये एकच हशा पिकला, पाहा Video
JSW Sports चे चीफ कमर्शियल ऑफिसर यांनी सांगितल्यानुसार, आता जेमिमा प्रति ब्रँड ७५ लाख ते १.५ कोटींपर्यंत पैसे आकारत आहे. जेमिमा आतापर्यंत BoAt, Hyundai, Red Bull, Gillette आणि Dream11 सारख्या मोठ्या कंपन्यांचा भाग आहे. आता तिला लाइफस्टाइल, वेलनेस आणि फायनान्ससारख्या नव्या क्षेत्रातून ऑफर मिळत आहे.
जेमिमा केवळ क्रिकेटच नाही तर डान्स, गाणं, गिटार आणि मानसिक आरोग्याबाबत मोकळेपणाने बोलत असल्याने ती लोकप्रिय आहे. म्हणूनच ब्रँड तिच्याकडे एक सकारात्मक आयकॉन म्हणून पाहतात. सद्यस्थितीत जेमिमाची एकून नेटवर्थ साधारण ८ ते १५ कोटींच्या घरात आहे.
कोण आहे भारतातील सर्वात कमाई करणारी महिला क्रिकेटर?
स्मृती मंधाना सध्या भारतातील सर्वाधिक कमाई करणारी महिला क्रिकेटर आहे. बीसीसीआयच्या केंद्रीय करारात स्मृती, हरमनप्रीत आणि दीप्ती शर्मा ग्रेड A (वर्षाला ५० लाख) मध्ये आहेत. मात्र स्मृतीची सर्वाधिक कमाई महिला प्रीमियर लीगमधून होते. तिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने स्मृतीचा ३.४ कोटींमध्ये खरेदी केलं होतं. जो लीगचा सर्वात मोठा कॉन्ट्रॅक्ट होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
