दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा पराभव करत आयपीएल 2024 मधील आपल्या तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे. दिल्लीने गुजरात संघाला अवघ्या 89 धावांवर गुंढाळलं. त्यानंतर 90 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीच्या संघाने तुफान फटकेबाजी करत अवघ्या 8.5 ओव्हरमध्ये लक्ष्य गाठलं.
दिल्ली विरुद्ध गुजरातच्या सामन्यादरम्यानचा कुलदीप यादवचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुलदीप यादव मैदानात मुकेश कुमारवर भडकल्याचं यात दिसत आहे. झालं असं की, आठव्या ओव्हरमध्ये गुजरातचा फंलदाज अभिनव मनोहरने एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुकेश कुमारने बॉलर एण्डला जोरात चेंडू फेकला.
घरच्या मैदानावर गुजरातचं पानिपत, दिल्लीचा सफाईदार विजय
मात्र या थ्रोची गरज नसल्याचं दाखवत, कुलदीप यादव मुकेश कुमारवर भडकला. कुलदीपने मुकेश कुमारला, 'पागल पागल है क्या' असं म्हटलं. कुलदीपचा राग स्टम्प्समधील माईकमध्ये कैद झाला. त्यानंतर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत कुलदीपकडे धावत आला आणि गुस्सा नहीं, गुस्सा नहीं, असं म्हणत त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला.
दिल्लीने हा सामना कमी षटकांत संपवल्याचा त्यांना फायदा झाला. त्यांच्या रनरेटमध्ये सुधारणा झाली आहे. दिल्लीने या विजयानंतर 6 अंकांसह नवव्या स्थानावरुन सहाव्या स्थानी झेप घेतली. तर दुसरीकडे गुजरात 6 अंकांसह सातव्या स्थानावर आहेत. दिल्लीचा नेट रनरेट -0.074 आहे, तर गुजरातचा नेट रनरेट -1.303वर पोहोचला आहे.
11 वर्षांनंतर एक गोष्ट घडली आणि IPL ला BCCI कडून परवानगी मिळाली
पॉइंटटेबलमध्ये कोण कुठे?
- राजस्थान रॉयल्स - 6 विजयांसह 12 अंक
- कोलकाता नाईट रायडर्स - 4 विजयांसह 8 अंक
- चेन्नई सुपरकिंग्स - 4 विजयांसह 8 अंक
- सनरायझर्स हैदराबाद - 4 विजयांसह 8 अंक
- लखनऊ सुपरजायंट्स - 3 विजयांसह 6 अंक
- दिल्ली कॅपिटल्स - 3 विजयांसह 6 अंक
- गुजरात टायटन्स - 3 विजयांसह 6 अंक
- पंजाब किंग्स - 2 विजयांसह 4 अंक
- मुंबई इंडियन्स - 2 विजयांसह 4 अंक
- रॉयल चॅलेन्जर्स बेंगलुरु- एका विजयासह 2 अंक
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world