जाहिरात
Story ProgressBack

टी-20 इतिहासातील 'रेकॉर्ड ब्रेक' सामना; कोलकाता विरुद्ध पंजाब सामन्यात हे 5 विक्रम मोडीत

आयपीएल 2024 च्या 42 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करत पंजाबसमोर 262 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं.

Read Time: 2 min
टी-20 इतिहासातील 'रेकॉर्ड ब्रेक' सामना; कोलकाता विरुद्ध पंजाब सामन्यात हे 5 विक्रम मोडीत

क्रिकेक प्रेमींसाठी 26 एप्रिल 2024 ही तारीख कामय लक्षात राहिल. कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळल्या गेलेल्या ईडन गार्डनमधील सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. फक्त आयपीएलच नाहीतर टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विक्रमही मोडले गेले. 

आयपीएल 2024 च्या 42 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करत पंजाबसमोर 262 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. अशक्य वाटणारं हे लक्ष्य पंजाब किंग्सने शक्य करुन दाखवलं. एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना सामना अटीतटीचा होण्याची शक्यता जास्त असते. मात्र पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी हा सामना अक्षरश: एकतर्फी बनवून सहज विजय मिळवला.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ऐतिहासिक रन चेज

पंजाबने 262 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत विजय मिळवत विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. याआधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावे होता. दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजविरुद्ध 2023 मध्ये 259 धावांचं लक्ष्य गाठलं होतं. तर आयपीएलमध्ये याआधी हा विक्रम राजस्थान रॉयल्सच्या नावे होता. राजस्थानने पंजाबविरुद्ध 2020 मध्ये 224 धावाचं लक्ष्य गाठलं होतं. 

नक्की वाचा- संजय मांजरेकरनं निवडली T20 वर्ल्ड कपची टीम, विराटसह 3 प्रमुख खेळाडू बाहेर 

सर्वाधिक षटकारांचा विक्रम

कालच्या सामन्यात सर्वाधित षटकार लगावले गेले. पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स दोन्ही संघांनी मिळून तब्बल 42 षटकार लगावले. पंजाबने 24 षटकार लगावले तर कोलकाताने 18 षटकार लगावले. एका डावात सर्वाधिक 24 षटकार लगावण्याचा विक्रमही पंजाबच्या नावे झाला आहे. 

दोन्ही संघांच्या ओपनर्सचं अर्धशतक

पंजाब आणि कोलकाता दोन्ही संघाच्या ओपनर्सनी काल अर्धशतक साजरं केलं. याआधी आयपीएलमध्ये असं कधीच झालं नव्हतं. हा देखील एक विक्रम आहे. कोलकाताकडून फिलिप सॉल्टने 37 चेंडू 75 धावा केल्या. तर सुनील नरेनले 32 चेंडूत 71 धावा ठोकल्या. पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने 20 चेंडूत 54 धावांची खेळी केली. तर जॉनी बेअरस्टोने 48 चेंडूत 108 धावा करत शतक साजरं केलं. 

(नक्की वाचा : यशस्वी जयस्वालला वर्ल्ड कपसाठी गिल नाही तर 'या' खेळाडूचं आव्हान ) 

एका सामन्यात सर्वाधिक धावा

एका सामन्यात याआधी रॉयल चॅलेन्जर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी 549 धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर सनराझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सने 523 धावा ठोकल्या होत्या. या विक्रमाच्या यादीत आता कालच्या सामन्याचीही नोंद झाली आहे. पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सने मिळून या सामन्यात 523 धावा कुटल्या. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination