जाहिरात
This Article is From Apr 13, 2024

MI vs CSK मॅचचा बदलणार इतिहास! 17 वर्षांमध्ये पहिल्यांदाच दिसणार 'हे' चित्र

MI vs CSK : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या मॅचमध्ये 17 वर्षांनंतर पहिल्यांदाच ही घटना घडत आहे.

MI vs CSK मॅचचा बदलणार इतिहास! 17 वर्षांमध्ये पहिल्यांदाच दिसणार 'हे' चित्र
MI vs CSK : महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा
मुंबई:

Mumbai Indians vs Chennai Super Kings : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (MI vs CSK)  या आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी टीम रविवारी वानखेडे स्टेडियमवर आमने-सामने येणार आहेत. या दोन्ही टीमनी आजवर पाचवेळा ही स्पर्धा जिंकलीय. 2017 पासून फक्त 2022 चा अपवाद वगळता मुंबई किंवा चेन्नई याच टीमनं आयपीएल विजेतेपद पटकावलं आहे. त्यावरुन त्यांचं आयपीएलवरील वर्चस्व स्पष्ट होतं. रविवारी दोन्ही टीममध्ये होणारा सामना हा खास असून त्यामध्ये नवा इतिहास लिहिला जाईल.

स्टार पॉवरची लढत

मुंबई इंडियन्सकडं रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह असे तगडे मॅचविनर आहेत. भारतीय क्रिकेट टीमचे आधारस्तंभ असलेली ही चौकडी मुंबईत घरच्या मैदानावर खेळणार आहे. दुसरिकडं चेन्नई सुपर किंग्सकडं महेंद्रसिंह धोनीचा करिश्मा आहे. 

नव्या रेकॉर्डनंतर 'ती' गोष्ट आठवून ऋतुराज भावुक, धोनीबद्दल म्हणाला...

टीम इंडियानं धोनीच्या कॅप्टनसीमध्ये 2011 साली वानखेडे स्टेडियमवरील वर्ल्ड कप फायनल जिंकली होती. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या त्या फायनलमध्ये महेंद्रसिंह धोनीनं सिक्सर लगावत भारताच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यामुळे धोनीचं वानखेडेशी खास कनेक्शन आहे.  

महेंद्रसिंह धोनीप्रमाणे कॅप्टन ऋतुराज गायकवाड, रविंद्र जडेजा हे स्टार चेन्नईकडं आहेत. अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, शार्दूल ठाकूर हे मुंबईकरही चेन्नईकडं असल्यानं त्यांचा वानखेडेवरील अनुभव सीएसकेसाठी उपयोगी ठरेल. 

17 वर्षांमध्ये पहिल्यांदाच....

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणाऱ्या या मॅचची फॅन्समध्ये उत्सुकता वाढलीय. त्याचबरोबर या मॅचमध्ये 17 वर्षांनंतर होणाऱ्या एका योगाची देखील फॅन्समध्ये चर्चा आहे. महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा यापैकी एकही कॅप्टनशिवाय या टीम पहिल्यांदाच एकमेकांच्या विरुद्ध खेळणार आहेत. 

'तो एकतर माझी बॅट तोडतो किंवा पाय', 'या' बॉलरला 2-3 वर्षांपासून खेळला नाही सूर्या
 

महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2022 मधील अर्धा सिझन वगळता सीएसकेचा कॅप्टन होता. या सिझनपूर्वी त्यानं ऋतुराज गायकवाडकंडं कॅप्टनसी सोपवली. तर, मुंबई इंडियन्सनंही या सिझनपूर्वी रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कॅप्टन केलंय. त्यामुळे रविवारच्या मॅचमध्ये हार्दिक पांड्या आणि ऋतुराज गायकवाड कॅप्टन म्हणून टॉसला उतरतील त्यावेळी एका नव्या इतिहासाची नोंद होईल. या कारणामुळे दोन्ही टीम्सच्या फॅन्ससाठी तसंच आयपीएल इतिहासामध्येही या सामन्याचं मोठं महत्त्व आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com