
आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झालीय. पहिल्या तीन्ही सामन्यात मुंबईचा पराभव झालाय. या सिझनमध्ये आत्तापर्यंत एकही सामना न जिंकलेली मुंबई इंडियन्सही एकमेव टीम आहे. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कॅप्टन करण्याचा निर्णयही मुंबईच्या अनेक फॅन्सना आवडलेला नाही. त्यामुळे त्यांच्या संतापाचाही टीमला सामना करावा लागतोय.
का होता सूर्या बाहेर?
वन-डे वर्ल्ड कपनंतर दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी20 सीरिजमध्ये सूर्यकुमार यादव भारतीय टीमचा कॅप्टन होता. डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या सीरिजमधील तिसऱ्या मॅचमध्ये सूर्यानं 56 बॉलमध्ये 100 रन्सची खेळी केली होती. त्यानंतर फिल्डिंग करताना सूर्या जखमी झाला होता. या दुखापतीनंतर सू्र्या क्रिकेटपासून दूर होता. बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) उपचार घेत होता. सूर्या फिट असल्याचं एनसीएनं जाहीर केल्यानंतर तो आता आयपीएल खेळण्यासाठी सज्ज झालाय.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील टी20 सीरिजमध्ये सूर्या खेळू शकला नव्हता. जून महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपपूर्वी सूर्यासाठी ही शेवटची स्पर्धा आहे.
मुंबई इंडियन्सनं केलं स्वागत
मुंबई इंडियन्सनं खास व्हिडीओ तसंच ट्विट शेअर करत सूर्याचं स्वागत केलंय.
Tu samjha? Nahi tu samjha nahi 😉#MumbaiMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/mibzFXbfQA
— Mumbai Indians (@mipaltan) April 4, 2024
आपला दादूस आला रे! 😍💙#MumbaiMeriJaan #MumbaiIndians | @surya_14kumar pic.twitter.com/0ZJldXIqE2
— Mumbai Indians (@mipaltan) April 5, 2024
कधी आहे मुंबईचा सामना?
मुंबई इंडियन्सचा पुढील सामना हा ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रविवारी (7 एप्रिल) रोजी होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये हा सामना होतोय. दिल्ली कॅपिटल्सची टीम पॉईंट टेबलमध्ये सध्या नवव्या क्रमांकावर आहे. त्यांनी चारपैकी तीन सामने गमावले असून चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध विजय मिळवला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world