जाहिरात
Story ProgressBack

RCB नं बदलला T20 क्रिकेटचा इतिहास, पहिल्यांदाच झाला 'हा' रेकॉर्ड

IPL 2024 MI vs RCB : आरसीबीनं हा सामना गमावला असला तरी एक नवा रेकॉर्ड केलाय.

Read Time: 2 min
RCB नं बदलला T20 क्रिकेटचा इतिहास, पहिल्यांदाच झाला 'हा' रेकॉर्ड
IPL 2024 : विराट कोहली आणि फाफ ड्यू प्लेसिस (फोटो सौजन्य : BCCI/IPL)
मुंबई:

IPL 2024 MI vs RCB : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ही आयपीएलमधील दोन हाय प्रोफाईल टीममधील लढत अखेर एकतर्फीच झाली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये आरसबीनं पहिल्यांदा बॅटिंग करत 8 आऊट 196 रन केले. आरसीबीनं दिलेलं 197 रनचं आव्हान मुंबई इंडियन्सनं 7 विकेट्स आणि 27 बॉल राखून पूर्ण केलं.

T20 क्रिकेटमध्ये रेकॉर्ड

आरसीबीनं हा सामना गमावला असला तरी एक नवा रेकॉर्ड केलाय. आरसीबीकडून या मॅचमध्ये कॅप्टन फाफ ड्यू प्लेसिस (61), रजत पाटीदार (50) आणि दिनेश कार्तिक (53 नाबाद) रनची खेळी केली. तर ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर आणि विजयकुमार विशाक एकही रन न करता आऊट झाले. T20 क्रिकेटच्या एकाच इनिंगमध्ये तीन जणांनी अर्धशतक आणि तीन जण शून्यावर आऊट होण्याची ही पहिलीच घटना आहे. हा खास रेकॉर्ड आरसीबीच्या नावावर नोंदवला गेला आहे. मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराह सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्यानं 21 रन देत 5 विकेट्स घेतल्या. 

विराट कोहलीच्या RCB ला अद्याप एकदाही आयपीएल चॅम्पियन का होता आले नाही?
 

मुंबई इंडियन्सची दमदार बॅटिंग

मुंबई इंडियन्सनं त्यांच्या इनिंगमध्ये पहिल्यापासूनच आक्रमक बॅटिंग केली. इशान किशननं फक्त 34 बॉलमध्ये 7 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीनं 69 रन काढले. तर मोठ्या दुखापतीनंतर परतलेल्या सूर्यकुमार यादवनं  19 बॉलमध्ये 52 रन काढले. रोहित शर्मानं 38 रनची खेळी केली. कॅप्टन हार्दिक पांड्या फक्त 6 बॉलमध्ये 3 सिक्ससह नाबाद 21 रन काढले. तिलक वर्माही 10 बॉलमध्ये 16 रन काढून नाबाद राहिला.

टीम इंडियाचा आधारस्तंभ जसप्रीत बुमराह करत होता कॅनडात स्थायिक होण्याचा विचार
 

या सामन्यात दोन्ही टीममधील मिळून पाच फलंदाजांनी अर्धशतक झळकावलं. एकाच सामन्यात पाच फलंदाजांनी अर्धशतक झळकावण्याची आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील ही पाचवी घटना आहे. यापूर्वी


पंजाब किंग्ज वि. राजस्थान रॉयल्स - शारजा, 2020
आरसीबी वि. मुंबई इंडियन्स - शारजा, 2020
आरसीबी वि. लखनौ सुपर जायंट्स - बंगळुरु, 2023
सीएसके वि. केकेआर - कोलकाता, 2023  या चार सामन्यात पाच जणांनी अर्धशतक झळकावलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination