
IPL 2025, GT vs SRH : आयपीएल 2025 मधील 51 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad) यांच्यात झाला. या मॅचमध्ये गुजरातनं दिलेलं 225 रन्सचं आव्हान हैदराबादला पेलवलं नाही. त्यांचा रन्सनं 38 पराभव झाला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हैदराबादकडून अभिषेक शर्मानं आक्रमक हाफ सेंच्युरी झळकावली. त्यानं फक्त 28 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी झळकावली. पण, त्याची ही खेळी देखील हैदराबादला पराभवापासून वाचवू शकली नाही. अभिषेकनं 41 बॉलमध्ये 74 रन्स काढले. गुजरातकडून प्रसिध कृष्णानं अचूक बॉलिंग केली. त्यानं 4 ओव्हर्समध्ये फक्त 19 रन देत 2 विकेट्स घेतल्या.
गुजरातचे या विजयानंतर 10 मॅचमध्ये 14 पॉईंट्स झाले असून त्यांनी पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर उडी मारली आहे.
गिलची फटकेबाजी, सुदर्शनचा रेकॉर्ड
त्यापूर्वी गुजरात टायटन्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 6 आऊट 224 रन्स केले. गुजरात टायटन्सकडून शुबमन गिल (Shubman Gill) आणि साई सुदर्शन (Sai Sudharsan) या फॉर्मातील जोडीनं दमदार सुरुवात केली.
( नक्की वाचा : Mumbai Indians : तळाची मुंबई इंडियन्स टॉपला कशी पोहोचली? वाचा विजयी सिक्सर्सचे 6 प्रमुख कारणं )
सुदर्शननं दिग्गज बॉलर मोहम्मद शमीच्या एकाच ओव्हरमध्ये पाच फोर लगावले. सुदर्शननं यावेळी T20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी मॅचमध्ये 2000 रन करणारा पहिला भारतीय बनला आहे. त्यानं 54 इनिंगमध्ये हा रेकॉर्ड केला. वर्ल्ड क्रिकेटमध्ये हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शच्या नावावर आहे. मार्शनं 53 मॅचमध्ये हा टप्पा पूर्ण केला होता. सुदर्शननं आऊट होण्यापूर्वी 23 बॉलमध्ये 9 फोरच्या मदतीनं 48 रन्स काढले होते.
सुदर्शन आऊट झाल्यानंतर शुबमन गिल आणि जोस बटलर यांचा धडाका सुरुच होता. या दोघांनीही दमदार हाफ सेंच्युरी झळकावली. गिलनं 38 बॉलमध्ये 76 तर बटलरनं 37 बॉलमध्ये 64 रन्स केले. सनरायझर्सकडून अनुभवी जयदेव उनाडकतनं शेवटच्या ओव्हर्समध्ये 3 विकेट्स घेतल्या. त्यानं वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवातिया आणि राशिद खान यांना एकाच ओव्हरमध्ये आऊट केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world