
IPL 2025 : आयपीएल 2025 मधील 48 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Kolkata Knight Riders vs Delhi Capitals ) यांच्यात झाला. या मॅचमध्ये केकेआरनं दिल्ली कॅपिटल्सचा 14 रन्सनं पराभव केला. केकेआरकडून अनुभवी सुनील नरीननं निर्णायक क्षणी 3 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर त्यानं केएल राहुलला रन आऊट देखील केलं.
केकेआरचा या सिझनमधील हा चौथा विजय आहे. या विजयामुळे गतविजेत्यांचे स्पर्धेतील आव्हान कायम आहे. तर या पराभवामुळे दिल्लीची वाटचाल थोडी बिकट होणार आहे.
केकेआरनं दिलेल्या 205 रन्सचा पाठलाग करत असताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. अभिषेक परोळ पहिल्याच ओव्हरमध्ये 4 रन काढून आऊट झाला. या सिझनमध्ये दमदार सुरुवात करणाऱ्या करुण नायरची साधारण कामगिरी सुरुच आहे. तो या मॅचमध्ये 15 रन काढून आऊट झाला. त्यानंतर सुनील नरीननं डायरेक्ट थ्रो करत केएल राहुलला (7) रन आऊट केले. त्यामुळे सातव्या ओव्हरमध्ये दिल्लीची अवस्था 3 आऊट 60 अशी झाली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिल्लीची पडझड सुरु असताना अनुभवी फाफ ड्यू प्लेसीनं (Faf du Plessis ) 31 बॉलमध्येच हाफ सेंच्युरी झळकावली. फाफनं 6 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं पन्नाशीचा टप्पा गाठला. फाफ आणि अक्षर जोडीनं चौथ्या विकेटसाठी 42 बॉलमध्ये 76 रन्सची पार्टनरशिप केली. अक्षर पटेल 23 बॉलमध्ये 43 रन काढून आऊट झाला. हा त्याचा या सिझनमधील सर्वोच्च स्कोअर आहे.
सुनीन नरीननं त्याच ओव्हरमध्ये धोकादायक स्टब्सला 1 रनवर आऊट केले. सुनील नरीननं पुढच्याच ओव्हरमध्ये ड्यू प्लेसिसला 62 रनवर आऊट करत दिल्लीला आणखी एक मोठा धक्का दिला.
सुनील नरीनपाठोपाठ वरुण चक्रवर्तीनंही केकेआरला निराश केलं नाही. त्यानं अठराव्या ओव्हरमध्ये सलग दोन विकेट्स घेत दिल्ली मॅचमध्ये परतणार नाही याची खबरदारी घेतली. . विपराज निगमनं शेवटच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करत 19 बॉलमध्ये 38 रन केले. पण, त्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले.
कोलकाताची सांघिक बॅटिंग
कोलकाता नाईट रायडर्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना सांघिक कामगिरीच्या जोरावर 9 आऊट 204 रन केले. केकेआरकडून व्यंकटेश अय्यरचा अपवाद वगळता सर्वांनी थोडं-थोडं योगदान दिलं. गुरबाज आणि नरीन जोडीनं पहिल्या विकेटसाठी 48 रन्सची पार्टनरशिप केली.
( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi : लक्ष्मणनं पुसले डोळे...द्रविडनं दिले धडे, 2 महान खेळाडूंनी कसा घडवला छोटा चॅम्पियन? )
केकेआरकडून मुंबईकर अंगक्रिष रघुवंशीनं (Angkrish Raghuvanshi) सर्वात जास्त 44 रन केले. तर सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या रिंकू सिंहनं 25 बॉलमध्ये 36 रन केले. आंद्रे रसेलनं शेवटी फटकेबाजी करत टीमला 200 रनचा टप्पा ओलांडून दिला. केकेआरनं शेवटच्या ओव्हर्समध्ये रनरेट वाढवण्याच्या प्रयत्नात विकेट्स गमावल्या.
दिल्लीकडून मिचेल स्टार्कनं सर्वात जास्त 3 विकेट्स घेतल्या. तर विपराज निगम आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world