जाहिरात

IPL 2025, LSG vs RR : यशस्वी जैस्वालची खेळी व्यर्थ, लखनौनं पराभवाच्या जबड्यातून खेचला विजय

IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये 36 वा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Lucknow Super Giants vs Rajasthan Royals ) यांच्यात झाला.

IPL 2025, LSG vs RR : यशस्वी जैस्वालची खेळी व्यर्थ, लखनौनं पराभवाच्या जबड्यातून खेचला विजय
मुंबई:

IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये 36 वा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Lucknow Super Giants vs Rajasthan Royals ) यांच्यात झाला.  शेवटच्या बॉलपर्यंत थरारक झालेल्या या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं राजस्थानचा 2 रन्सनी पराभव केला,  यशस्वी जैस्वालची दमदार इनिंग आणि 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं खणखणीत पदार्पण हे राजस्थानच्या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं. पण त्यानंतरच्या बॅटर्सनी निराशा केल्यानं राजस्थाननं हातामधील सामना गमावला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

लखनौनं दिलेल्या 181 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना राजस्थाननं दमदार सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 85 रनची भागिदारी केली. 

वैभव सूर्यवंशी हा आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. वैभवनं 14 वर्ष 23 दिवस पूर्ण केल्यानंतर आयपीएलमध्ये पदार्पण केलं. त्यानं पहिल्या मॅचमध्ये आत्मविश्वासपूर्वक खेळी केली. वैभव 20 बॉलमध्ये 34 रन्स काढून आऊट झाला. या खेळीत त्यानं 2 फोर आणि 3 सिक्स लगावले.

यशस्वीनं या सिझनमधील सलग तिसरी हाफ सेंच्युरी झळकावली. त्यानं  52 बॉलमध्ये 74 रन केले. तर रियान पराग 39 रन काढून आऊट झाला. आवेश खाननं शेवटच्या ओव्हरमध्ये धोकादायक हेटमायरला आऊट केलं. त्यामुळे राजस्थानची टीम अडचणीत सापडली होती. आवेश खाननं शेवटच्या ओव्हरमध्ये त्याचा अनुभव पणाला लावत लखनौला संस्मरणीय विजय मिळवून दिला. 

Vaibhav Suryavanshi : आयपीएलचा इतिहास बदलला, 14 वर्षाच्या मुलानं केलं पदार्पण, पहिल्याच मॅचमध्ये खणखणीत सुरुवात

( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi : आयपीएलचा इतिहास बदलला, 14 वर्षाच्या मुलानं केलं पदार्पण, पहिल्याच मॅचमध्ये खणखणीत सुरुवात )


मारक्रम, बदोनीची हाफ सेंच्युरी

त्यापूर्वी लखनौ सुपर जायंट्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 5 आऊट 180 रन्स केले. लखनौकडून एडन मारक्रम आणि आयुष बदोनीनं हाफ सेंच्युरी झळकावली. मारक्रमनं सर्वात जास्त 66 रन्स काढले. त्यानं 45 बॉलमध्ये 5 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं ही खेळी केली.

तर आयुष बदोनीनं 34 बॉलमध्ये 50 रन्स केले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 49 बॉलमध्ये 76 रन केले. अब्दुल समदनं शेवटच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करत 10 बॉलमध्ये नाबाद 30 रन केले. लखनौचा कॅप्टन ऋषभ पंत या सामन्यात अपयशी ठरला. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध हाफ सेंच्युरी करणारा पंत या मॅचमध्ये फक्त 3 रन काढून आऊट झाला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: