जाहिरात

IPL 2025 : फिक्सिंगच्या आरोपावर राजस्थान रॉयल्सनं मौन सोडलं, लखनौविरुद्धच्या पराभवानंतर झाले होते आरोप

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (Rajasthan Royals vs Lucknow Super Giants) सामन्याच्या निकालावर हा संशय व्यक्त करण्यात आला होता.

IPL 2025 : फिक्सिंगच्या आरोपावर राजस्थान रॉयल्सनं मौन सोडलं, लखनौविरुद्धच्या पराभवानंतर झाले होते आरोप
मुंबई:

जगातील सर्वात श्रीमंत आणि खडतर समजल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील सामन्यावर फिक्सिंगचे आरोप करण्यात आले होते. राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (Rajasthan Royals vs Lucknow Super Giants) सामन्याच्या निकालावर हा संशय व्यक्त करण्यात आला होता. राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी जयदीप बिहानी यांनीच या निकालावर संशय व्यक्त केला होता. त्यामुळे हे प्रकरण आणखी गंभीर बनलं होतं. या सर्व विषयावर राजस्थान रॉयल्सनं अखेर मौन सोडलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

राजस्थान रॉयल्सनं या प्रकरणात राजस्थानचे मुख्यमंत्री, क्रीडा मंत्री आणि क्रीडा सचिवांकडं तक्रार केली आहे. या प्रकरणात बिहानी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलीय.  टीमचे वरिष्ठ अधिकारी दीप रॉय यांनी बिहानी यांचे आरोप 'खोटे, निराधार आणि कोणत्याही पुराव्याशिवाय' केलेले असल्याचे सांगत फेटाळले आहेत. 

राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजमेंटनं या आरोपांवर तीव्र आक्षेप घेत म्हंटलं की, 'आम्ही तदर्श समिती संयोजकांनी केलेले सर्व आरोप फेटाळत आहोत. या प्रकराचे सार्वजनिक वक्तव्य हे दिशाभूल करणारे आहेत. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्स, रॉयल मल्टी स्पोर्ट प्राइवेट लिमिटेड (आरएमपीएल), राजस्थान खेळ परिषत आणि बीसीसीआयची प्रतिष्ठा आणि विश्वासनीयतेचे गंभीर नुकसान करणारे आहेत. '

( नक्की वाचा : IPL 2025, LSG vs RR : यशस्वी जैस्वालची खेळी व्यर्थ, लखनौनं पराभवाच्या जबड्यातून खेचला विजय )

फ्रँचायझीने राज्य संघटना आणि सरकारसोबतच्या 18 वर्षांच्या भागीदारीवर आणि बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पूर्ण पालन करून सुरू असलेल्या कामावर भर दिला आहे. बीसीसीआयच्या सध्याच्या व्यवस्थेनुसार, राजस्थान स्पोर्ट्स कौन्सिलकडे चालू हंगामात जयपूरमध्ये आयपीएल सामने आयोजित करण्याचे अधिकृत अधिकार आहेत.

स्पर्धेचे यशस्वी आयोजन सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली परिषद आणि बीसीसीआय या दोघांच्या समन्वयाने काम करत असल्याचे रॉयल्सने स्पष्ट केले.

यापूर्वी, बिहानी म्हणाले होते की, आरसीएने राज्यात आयसीसी-बीसीसीआय आंतरराष्ट्रीय सामने आणि स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे.मात्र सरकारने स्थापन केलेल्या तदर्थ समितीला जयपूर येथे होणाऱ्या आयपीएल सामन्यापासून दूर ठेवून क्रीडा परिषद क्रीडा हिताच्या विरोधात षड्यंत्र रचत आहे.

राज्य क्रीडा परिषदेने आरसीएच्या तदर्थ समितीला आयपीएलच्या आयोजनापासून दूर ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. कार्यक्रमाशी संबंधित सदस्यांसाठी त्यांनी ओळखपत्रही तयार केले नाही, असा दावाही त्यांनी केला होता. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: