जाहिरात

IPL 2025 : ठुकरा के मेरा प्यार... दुखावलेल्या मोहम्मद सिराजचा RCB ला तडाखा!

IPL 2025, RCB vs GT : एकेकाळी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचा (RCB) आधारस्तंभ असलेल्या मोहम्मद सिराजला आरसीबीनं रिटेन न करत सर्वांनाच धक्का दिला होता.

IPL 2025 : ठुकरा के मेरा प्यार... दुखावलेल्या मोहम्मद सिराजचा RCB ला तडाखा!
मुंबई:

IPL 2025, RCB vs GT :  आयपीएल 2025 पूर्वी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये सर्वच टीमची नव्यानं रचना झाली आहे. एकेकाळी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचा (RCB) आधारस्तंभ असलेल्या मोहम्मद सिराजला आरसीबीनं रिटेन न करत सर्वांनाच धक्का दिला होता. त्यानंतर ऑक्शनमध्ये सिराजला गुजरात टायटन्सनं खरेदी केलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सिराजनं ऑक्शननंतर आरसीबीनं इमोशनल पोस्ट लिहित त्याची भावना व्यक्त केली. आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु (GT vs RCB) या लढतीसाठी सिराज बेंगुळुरुमध्ये आला त्यावेळी तो पाहुण्या टीमच्या ड्रेसिंग रुममध्ये होता.

सिराज पाहुण्या टीममध्ये असला तरी त्याची चिन्नास्वामी स्टेडियमशी असलेली नाळ तुटलेली नाही. बुधवारी (2 एप्रिल, 2025) मध्ये झालेल्या मॅचमध्ये त्यानं हे दाखवून दिलं. बॅटिंगसाठी नंदनवन समजलं जाणाऱ्या या मैदानात सिराजनं आरसीबीला हादरे दिले.

( नक्की वाचा : Rohit Sharma : सचिन तेंडुलकरनं घेतली रोहित शर्माची गळाभेट, फॅन्सनं सांगितला अर्थ )

सिराजनं या मॅचमध्ये 4 ओव्हर्समध्ये फक्त 19 रन्स देत 3 विकेट्स घेतल्या. सिराजनं पहिल्या स्पेलमध्ये आक्रमक फिल सॉल्टला बाद करत दमदार सुरुवात केली. सिराजनं सॉल्टची दांडी गुल केली. त्याचं 'मुझे क्यों तोडा' असं ट्विट गुजरात टायटन्सनं केलं.

सिराजा हा धडाका इथंच थांबला नाही त्यानं त्यापाठोपाठ देवदत्त पडिक्कलला देखील त्यानं त्याच पद्धतीनं आऊट केलं. तर 19 व्या ओव्हरमध्ये आरसीबीकडून सर्वात जास्त (54) रन्स करणाऱ्या लियाम लिव्हिंगस्टोनला सिराजनं आऊट केलं. सिराजनं 4 ओव्हरमध्ये फक्त 19 रन देत आरसीबीच्या तीन दिग्गज बॅटर्सना आऊट केलं.

आरसीबीनं या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 आऊट 169 रन्स केले. आरसीबीची सुरुवात खराब झाली. विराट कोहली 7 रन्स काढून आऊट झाला. त्यानंतर फिल सॉल्ट, पडिक्कल आणि कॅप्टन रजत पाटीदारही स्वस्तात आऊट झाले. त्यामुळे आरसीबीची अवस्था 4 आऊट 42 झाली होती.

जितेश शर्मा आणि लियाम लिव्हिंगस्टोननं पाचव्या विकेटसाठी 52 रन्सची पार्टरनरशिप करत इनिंगला सावरण्याचा प्रयत्न केला. शर्मानं 33 रन्स काढले. तर टीम डेव्हिडनं 18 बॉलमध्ये 32 रन करत टीमला गुजरातसमोर 170 रन्सचं आव्हान ठेवलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: