
IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये गुजरातचा साई सुदर्शन भलत्याच फॉर्मात दिसत आहे. हैदराबाद सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यात साई सुदर्शनने 23 चेंडूत 48 धावांची खेळी केली. आपल्या धमाकेदार खेळीसह साई सुदर्शनने टी 20 क्रिकेटमध्ये 2000 धावांचा टप्पा गाठला आहे. यासह साई सुदर्शनने एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे. साई सुदर्शन शुन्यावर बाद न होता सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. साई सुदर्शन आतापर्यंत टी 20 क्रिकेटमध्ये शुन्यावर बाद न होता 2016 धावा केल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शुन्यावर बाद न होता टी 20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
- 2016* धावा : साई सुदर्शन (54 डाव) भारत
- 1420 धावा : कडोवाकी-फ्लेमिंग (35 डाव) जपान
- 1378 धावा : मार्क बाउचर (76 डाव) दक्षिण आफ्रिका
- 1337 धावा : तैय्यब ताहिर (46 डाव) पाकिस्तान
- 1231 धावा : रजत पालीवाल (63 डाव) भारत
- 1076 धावा : कैमरून ग्रीन (49 डाव) ऑस्ट्रेलिया
- 1015 धावा : रोहन कुन्नूमल (33 डाव) भारत
( नक्की वाचा : Mumbai Indians : तळाची मुंबई इंडियन्स टॉपला कशी पोहोचली? वाचा विजयी सिक्सर्सचे 6 प्रमुख कारणं )
यासोबत साई सुदर्शन टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करणारा दुसरा फलंदाज बनला आहे. सुदर्शनने 54 डावांमध्ये हा टप्पा गाठला. या विक्रमासह सुदर्शनने सचिन आणि ब्रॅड हॉज सारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे.
टी20 मध्ये सर्वात जलद 2000 धावा
- शॉन मार्श - 53 डाव
- साई सुदर्शन* - 54 डाव
- ब्रॅड हॉज / मार्कस ट्रेस्कोथिक / मोहम्मद वसीम- 58 डाव
- सचिन तेंडुलकर / डी'आर्सी शॉर्ट - 59 डाव
सनारायझर्स विरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 224 धावा केल्या. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघ 20 षटकांत केवळ 186 धावाच करू शकला. गुजरात हा सामना 38 धावांनी जिंकत पॉइंट टेबलमध्ये 14 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्स संघ पहिल्या स्थानावर आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world