Joe Root vs Sachin Tendulkar: इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉननं जो रुटबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. जो रुट याच पद्धतीनं खेळला तर तो एक दिवस सचिन तेंडुलकरचा टेस्ट क्रिकेटमधील सर्वाधिक रनचा रेकॉर्ड तोडेल (Joe Root vs Sachin Tendulkar ) असं भाकित वॉननं केलंय. रुट सध्या 33 वर्षांचा आहे. त्याचा फिटनेसह आणि फॉर्म दोन्हीही चांगला आहे. ते पाहून वॉननं ही भविष्यवाणी केली आहे.
रुट खरंच रेकॉर्ड तोडणार?
रुटनं आत्तापर्यंत 142 टेस्ट खेळल्या आहेत. त्याच्याकडं अजूनही 5 वर्षांचं क्रिकेट शिल्लक आहे. तो जखमी झाला नाही आणि सतत खेळत राहिला तर हे शक्य आहे. पण, हे सर्व त्याच्या फिटनेसवर अवलंबून आहे. रुटनं कोव्हिड 19 नंतर आत्तापर्यंत 46 टेस्ट खेळल्या आहेत. त्यामध्ये एकूण 4000 पेक्षा जास्त रन केले आहेत. तो गेल्या 4 वर्षांपासून ज्या सरासरीनं खेळतोय ते पाहून त्याला सचिनचा रेकॉर्ड मोडण्यासाठी आणखी 40 टेस्ट खेळाव्या लागतील. वयोमानानुसार बॅटरचा फॉर्म घसरतो. त्यामुळे आगामी काळात रुटची सरासरी कमी होऊ शकते. पण, सध्या रुटचा फिटनेस पाहाता तो सचिनचा रेकॉर्ड मोडण्यासाठी जोरदार प्रयत्न करु शकतो.
सचिन तेंडुलकरनं त्याच्या टेस्ट करियरमधील शेवटचे 4000 रन 49 टेस्टमध्ये काढले होते. रुट सध्या ज्या सरासरीनं खेळतोय ते पाहाता तो सचिनच्या ऑल टाईम टेस्ट रन्सच्या रेकॉर्डजवळ येऊ शकतो, असा अंदाज आहे. पॉन्टिंगनं त्याच्या करिअरमधील शेवटचे 4000 रन 57 टेस्टमध्ये काढले होते. याचाच अर्थ आगामी काळात फॉर्म आणि फिटनेस हे रुटसाठी महत्त्वाचे फॅक्टर ठरतील.
( नक्की वाचा : BCCI नं वाढवली मुंबई इंडियन्सची डोकेदुखी, पुढच्या सिझनमध्ये काय होणार? )
इंग्लंड किती मॅच खेळणार?
फेब्रुवारी 2027 पर्यंत इंग्लंड क्रिकेट टीम 30 टेस्ट मॅच खेळणार आहे. त्याशिवाय इंग्लंडनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला तर त्याला आणखी एक टेस्ट मॅच खेळण्याची संधी मिळेल. येत्या चार वर्षातील या सर्व टेस्टमध्ये रुटनं कमाल केली तरच तो सचिनचा रेकॉर्ड मोडण्याचा विचार करु शकतो.
सचिनची सरासरी सरस
टेस्ट कारकिर्दीमधील 142 टेस्ट मॅचमधील सरासरीची तुलना केली तर सचिनची सरासरी रुटपेक्षा सरस आहे. सचिननं त्याच्या 142 टेस्टमधील 229 इनिंगमध्ये 55.06 च्या सरासरीनं 11,289 रन केले होते. तर रुटनं 142 टेस्टमधील 260 इनिंगमध्ये 49.85 च्या सरासरीनं 11,940 रन काढले आहेत. सरासरीमध्ये सचिन पुढं आहे. तर रुटनं सचिनपेक्षा 651 रन जास्त काढले आहेत. रुटनं 142 टेस्टमध्ये 260 इनिंगमध्ये बॅटिंग केलीय. तर सचिननं 142 टेस्टमद्ये 229 इनिंग बॅटिंग केली होती.
( नक्की वाचा : विराट कोहलीबरोबरचं नातं कसं आहे? कोच गंभीरनं दिलं सडेतोड उत्तर )
कुणाची शतकं जास्त?
सचिन आणि रुटच्या शतकांची तुलना केली तर सचिननं 142 टेस्टमध्ये 37 शतक लगावले होते. तर रुटनं 142 टेस्टनंतर 32 शतक झळकावली आहेत. याचाच अर्थ 142 टेस्टनंतर सचिनची रुटपेक्षा जास्त शतक आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन करणाऱ्या बॅटर्सच्या यादीत रुट सध्या आठव्या क्रमांकावर आहेत. सध्या सचिन तेंडुलकर (15,921), रिकी पॉन्टिंग (13,378), जॅक कॅलिस (13,289), राहुल द्रविड (13,288), एलिस्टर कुक (12,472), कुमार संगाकारा (12,400) आणि ब्रायन लारा (11,953) हे रुटच्या पुढं आहेत. जो रुट लवकरच लाराला मागं टाकेल. लाराला मागं टाकण्यासाठी त्याला फक्त 13 रनची आवश्यकता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world