Kamran Ghulam Was Slapped By Haris Rauf: पाकिस्तानचा बॅटर कमरान गुलामनं त्याच्या पदार्पणाच्या टेस्टमध्येच सेंच्युरी झळकावली आहे. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यात मुलतानमध्ये (Pakistan vs England, Multan Test) सध्या टेस्ट सुरु आहे. या टेस्टमध्ये माजी कॅप्टन बाबर आझमच्या जागी कामरानचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. या सेंच्युरीनंतर त्याची सर्वजण प्रशंसा करत आहेत. पण, पाकिस्तानी टीममध्ये जागा मिळवण्यासाठी गुलामनं बरेच कष्ट घेतले आहेत, हे खूप कमी लोकांना माहिती आहे. इतकंच नाही तर पाकिस्तान सुपर लीगच्या (PSL) मॅचमध्ये त्यानं टीममधील सहकाऱ्याकडून भर मैदानात थप्पड देखील खाल्ली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
हा प्रकरण पीएसएल 2022 मधील आहे. त्यावेळी कामरान गुलाम लाहोर कलंदर्स टीमचा सदस्य होता. हॅरिस राऊफ आणि शाहीन आफ्रिदी हे पाकिस्तानी स्टार देखील त्या टीमकडून खेळत होते. त्या मॅचच्या दरम्यान गुलामनं राऊफच्या बॉलिंगवर पेशावर जाल्मीचा बॅटर हजरतुल्लाह जजईचा कॅच सोडला होता.
हॅरिस राऊफ त्यावेळी काही बोलला नाही. पण, त्याच ओव्हरमधील पाचव्या बॉलवर मोहम्मद हॅरिस फवाद अहमदकडं कॅच देऊन आऊट झाला. त्या विकेटनंतर हॅरिस राऊफचं अभिनंदन करण्यासाठी गुलाम त्याच्याजवळ गेला. त्यावेळी रागात असलेल्या हॅरीस राऊफनं गुलामला भर मैदानात सर्वांसमोर जोरदार थप्पड लगावली.
( नक्की वाचा : PAK vs ENG 1st Test : पाकिस्तानचं घरच्या मैदानावर वस्त्रहरण, 556 रन करुनही एका इनिंगनं पराभव )
हा सर्व प्रकार मजेत झाल्याचा दावा काही जणांनी केला. पण, सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये राऊफनं गुलामला जोरदार थप्पड लगावली असल्याचं दिसत आहे. त्यावेळी राऊफनं त्याला काही अपशब्द देखील सुनावले होते. कामरान गुलामच्या सेंच्युरीनंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Time when Harris Rauf Slapped Kamran Ghulam in PSL pic.twitter.com/U3Y9N7rKT9
— Shah (@ipagshah00) October 15, 2024
गुलामची पदार्पणातच सेंच्युरी
पाकिस्तान टीममध्ये संधी मिळताच गुलामनं त्याचा फायदा उठवला. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सध्या 3 मॅचची टेस्ट सीरिज सुरु आहे. या सीरिजमधील दुसऱ्या टेस्टमध्ये पदार्पण करताना त्यानं सेंच्युरी झळकाली. गुलामनं पदार्पणाच्या टेस्टमध्ये 118 रन काढले. त्याच्या खेळीमुळे पाकिस्तानला पहिल्या इनिंगमध्ये 366 रन केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world