जाहिरात

Dickie Bird: क्रिकेटचा आयकॉन हरपला! महान अंपायर डिकी बर्ड यांचे निधन; 3 वर्ल्ड कप फायनलमध्ये महत्त्वाची भूमिका

Legendary Umpire Harold 'Dickie' Bird Dies Aged 92 : क्रिकेट विश्वातील लोकप्रिय अंपायर हॅरॉल्ड 'डिकी' बर्ड यांचे 92 व्या वर्षी निधन झाले आहे.

Dickie Bird: क्रिकेटचा आयकॉन हरपला! महान अंपायर डिकी बर्ड यांचे निधन; 3 वर्ल्ड कप फायनलमध्ये महत्त्वाची भूमिका
Dickie Bird
मुंबई:

Legendary Umpire Harold 'Dickie' Bird Dies Aged 92 : क्रिकेट विश्वातील लोकप्रिय अंपायर हॅरॉल्ड 'डिकी' बर्ड यांचे 92 व्या वर्षी निधन झाले आहे. इंग्लंडमधील यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबने मंगळवारी निवेदन प्रसिद्ध करत अधिकृत घोषणा केली

डिकी बर्ड हे क्रिकेटमधील सर्वात प्रसिद्ध आणि आदरणीय अंपायर्सपैकी एक होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 66 टेस्ट आणि 69 आंतरराष्ट्रीय वन-डे मॅचमध्ये अंपायर म्हणून काम केले. यामध्ये तीन वर्ल्ड कप फायनलचा समावेश आहे. 

यॉर्कशायर क्लबने डिकी बर्ड यांच्या निधनाची बातमी प्रसिद्ध करताना  वेबसाइटवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "क्रिकेटमधील सर्वात आवडत्या व्यक्तींपैकी एक असलेले डिकी बर्ड यांचे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले."

( नक्की वाचा : Smriti Mandhana: स्मृती मंधनाचं ऑस्ट्रेलिया विरुद्ध वादळ, दमदार सेंच्युरीसह विराट कोहलीचाही मोडला रेकॉर्ड )
 

क्लबने पुढे म्हटले आहे, "डिकी बर्ड यांची आंतरराष्ट्रीय अंपायर म्हणून कारकीर्द खूप मोठी होती. खेळाच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय अंपायर म्हणून त्यांनी स्वत:चे नाव कोरले. ते यॉर्कशायर क्रिकेटशी एकनिष्ठ होते. 2014 मध्ये, त्यांची यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाली होती आणि त्यांनी ही भूमिका अभिमानाने पार पाडली."

अंपायर म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावण्यापूर्वी बर्ड यांनी यॉर्कशायर आणि लीसेस्टरशायर या इंग्लिश काउंटी संघांसाठी क्रिकेट खेळले होते.

यॉर्कशायरच्या निवेदनात पुढे म्हटले आहे, "त्यांनी आपल्या यशस्वी कारकिर्दीत 66 कसोटी सामने आणि 69 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायर म्हणून काम केले, ज्यात तीन विश्वचषक फायनलचा समावेश आहे. त्यांची प्रामाणिकपणा, विनोदबुद्धी आणि खास शैली यामुळे खेळाडू आणि फॅन्स यांनी नेहमीच त्यांचा आदर केला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com