जाहिरात

IPL 2025 : मिचेल मार्शनं रचला इतिहास, 17 वर्षांच्या इतिहासात 'हा' रेकॉर्ड करणारा लखनौचा दुसरा खेळाडू

IPL 2025, GT vs LSG : आयपीएल 2025 मध्ये आज (गुरुवार 22 मे)  गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (Gujarat Titans vs Lucknow Super Giants ) यांच्यात मॅच झाली

IPL 2025 : मिचेल मार्शनं रचला इतिहास, 17 वर्षांच्या इतिहासात 'हा' रेकॉर्ड करणारा लखनौचा दुसरा खेळाडू
मुंबई:

IPL 2025, GT vs LSG : आयपीएल 2025 मध्ये आज (गुरुवार 22 मे)  गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (Gujarat Titans vs Lucknow Super Giants ) यांच्यात मॅच झाली. या मॅचमध्ये लखनौनं पहिल्यांदा बॅटिंग करत गुजरातसमोर विजयासाठी 236 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. मिचेल मार्शच्या दमदार सेंच्युरीमुळे लखनौनं हे आव्हान ठेवलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

या सिझनमध्ये फॉर्मात असलेल्या मार्शनं एडन मार्करम (Aiden Markram)  सोबत लखनौला चांगली सुरुवात करुन दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 91 रनची पार्टरनरशिप केली. तर निकोलस पूरननं (Nicholas Pooran) फक्त 27 बॉलमध्ये 4 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीनं नाबाद 56 रन्स केले. मार्श आणि पूरननं दुसऱ्या विकेटसाठी 121 रन्सची पार्टनरशिप केली. 

( नक्की वाचा : IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यात AK-47 ठरु शकतो टीम इंडियाचं खास हत्यार ! IPL कोचनं सांगितलं कारण )

मार्शनं राशिद खाननं टाकलेल्या 12 व्या ओव्हरमध्ये दोन सिक्स आणि तीन फोरच्या मदतीनं 25 रन केले. त्यानं फक्त 56 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावली.

मार्शने रचला इतिहास

मिचेल मार्शने 56 बॉलमध्ये सेंच्युरी करत नवा रेकॉर्ड केला. मार्शच्या नावावर आणखी एक विक्रम जमा झाला आहे. आता तो एका मोसमात केएल राहुलपाठोपाठ एलएसजीसाठी सर्वाधिक (६ वेळा) 50 पेक्षा जास्त रन्स  करणारा दुसरा बॅटर ठरला आहे. 

गुजरातकडून अर्शद खान आणि साई किशोर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.  गुजरात टायटन्सनं यापूर्वीच आयपीएल प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. तर लखनौचं या सिझनमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com