
India vs England Test Series : आयपीएल 2025 नंतर (IPL 2025) भारतीय टीम पाच टेस्टच्या सीरिजसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही देशांमधील सीरिजला 20 जूनपासून सुरुवात होतीय. या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच होणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) निवृत्तीनंतर या सीरिजमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन नवा असेल. त्याचबरोबर कोणत्या खेळाडूंची टीममध्ये निवड होणार याची देखील सर्वांना उत्सुकता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आगामी इंग्लंड सीरिजसाठी फास्ट बॉलर अंशुल कंबोज (Anshul Kamboj ) हा भारतीय क्रिकेट टीमसाठी उत्तम पर्याय असू शकतो, असा विश्वास चेन्नई सुपर किंग्सचे कोच (Chennai Super Kings) स्टिफन फ्लेमिंग ( Stephen Fleming ) यांनी व्यक्त केला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या चेन्नईच्या मॅचनंतर बोलताना फ्लेमिंग म्हणाला की, 'कंबोजची फसवी गती आणि योग्य लांबीवर चेंडू टाकण्याची क्षमता इंग्लंडमधील परिस्थितीत खूप उपयुक्त ठरू शकते.'
देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरियाणाकडून खेळणारा अंशुल कंबोजला ड्रेसिंग रुममध्ये AK-47 या नावानं देखील ओळखलं जातं.
( नक्की वाचा : IPL 2025 नंतर इंग्लंड दौऱ्यात आयुष म्हात्रे-वैभव सूर्यवंशी करणार धमाका, टीम इंडिया U19 जाहीर )
फ्लेमिंग पुढं म्हणाला की, "कंबोज चांगला बॉलर आहे. त्याची स्पीड 138-139 किमी प्रती तास आहे. त्याची बॉलिंग फसवी आहे. त्याचा बॉल नेहमीच ग्लोव्हजवर ग्लोव्हजवर अधिक वेगाने आदळतो. त्याची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची लांबी, आणि तो चेंडूला थोडा वळवतो. या वर्षीच्या आयपीएलमध्ये तुम्ही पाहिलेच असेल की त्याने सपाट विकेटवर कशी कामगिरी केली आहे. मला विश्वास आहे की, जर त्याला थोडी सीम आणि थोडा स्विंग मिळवणारी परिस्थिती मिळाली, तर तो इंग्लंड दौऱ्यावर चांगली कामगिरी करेल."
कंबोजची इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दोन सामन्यांसाठी भारत 'अ' संघात निवड झाली आहे. तो वरिष्ठ संघाविरुद्धच्या इंट्रा-स्क्वाड सामन्यातही खेळण्याची शक्यता आहे. या सामन्यांमधील चांगली कामगिरी त्याच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते
कंबोजबद्दल बोलताना फ्लेमिंग म्हणाला की, 'तो (इंग्लंडच्या परिस्थितीत) एक परिपूर्ण गोलंदाज असेल. त्याच्याकडे पांढऱ्या आणि लाल दोन्ही चेंडूंनी चांगली कामगिरी करण्याची खरी क्षमता आहे. त्याच्या विकासावर आणि यावर्षी त्याला मिळालेल्या संधीवर आम्ही समाधानी आहोत.'
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world