जाहिरात

Babar Azam : बाबर आझमनंतर पाकिस्तानचा कॅप्टन होण्यासाठी 'हा' खेळाडू आघाडीवर

Babar Azam:  पाकिस्तान क्रिकेटमध्ये आणखी एक भूकंप झाला आहे. बाबर आझमनं पाकिस्तानच्या लिमिटेड ओव्हर्सच्या टीमच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

Babar Azam : बाबर आझमनंतर पाकिस्तानचा कॅप्टन होण्यासाठी 'हा' खेळाडू आघाडीवर
मुंबई:

Pakistan Team Next Limited Over Captain After Babar Azam:  पाकिस्तान क्रिकेटमध्ये आणखी एक भूकंप झाला आहे. बाबर आझमनं पाकिस्तानच्या लिमिटेड ओव्हर्सच्या टीमच्या कर्णधारपदाचा राजीनामा (Babar Azam Step Down as Limited Over Captain) दिला आहे. बाबरनं बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) याबाबतचं वक्तव्य प्रसिद्ध केलं आहे. बाबरनं यापुढं संपूर्ण लक्ष बॅटिंगवर केंद्रीत करणार असल्याची घोषणा केलीय. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कुणाचे नाव आघाडीवर?

जियो न्यूजच्या एका रिपोर्टनुसार बाबर आझमनं व्हाईट बॉल क्रिकेट टीमची कॅप्टनसी सोडण्याची घोषणा केल्यानंतर मोहम्मद रिझवान Mohammad Rizwan Likely to Replace Babar Azam as Limited Over Captain) त्याची जागा घेऊ शकतो.

या रिपोर्टनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अधिकारी टीमच्या निवडीच्या दरम्यान रिझवानसोबत बैठक करतील. जियो न्यूजच्या रिपोर्टनुसार पीसीबीच्या अधिकाऱ्यांनी बाबरला राजीनामा देण्याबाबत कोणतीही सूचना केली नव्हती. कारण, बाबर आझमनंचं कॅप्टनसी करावी, अशी व्हाईट बॉल टीमचे कोच गॅरी कस्टर्न यांची इच्छा होती.

WTC Points Table : बांगलादेशला लोळवल्यानंतर टीम इंडिया सुसाट, फायनलसाठी कसं आहे समीकरण?

( नक्की वाचा :  WTC Points Table : बांगलादेशला लोळवल्यानंतर टीम इंडिया सुसाट, फायनलसाठी कसं आहे समीकरण? )

पाकिस्तान क्रिकेट टीमच्या कॅप्टनची टाईमलाईन

15 नोव्हेंबर 2023 : वनडे वर्ल्ड कपमधील पराभवानंतर बाबर आझमनं कॅप्टनसी सोडली. शान मसूदला टेस्ट टीमचा कॅप्टन म्हणून नियुक्त करण्यात आलं. शाहीन आफ्रिदीला T20 टीमचा कॅप्टन करण्यात आलं. 

31 मार्च 2024 : शाहीन आफ्रिदीला T20 टीमच्या कर्णधारपदावरुन हटवण्यात आलं. बाबर आझम पुन्हा व्हाईट बॉल टीमचा कॅप्टन झाला. शान मसूद टेस्ट टीमचा कॅप्टन कायम

2 ऑक्टोबर  2024 : बाबर आझमनं वन-डे आणि टी20 टीमच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. 

बाबरनं गेल्यावर्षी भारतामध्ये झालेल्या वन-डे वर्ल्ड कपमधील टीमच्या निराशाजनक प्रदर्शनानंतर पाकिस्तान टीमची कॅप्टनसी सोडली होती. पण, मार्च महिन्यात त्याला पुन्हा एकदा लिमिटेड ओव्हर्सच्या टीमचा कॅप्टन नियुक्त करण्यात आले. त्याच्या कर्णधारपदाची दुसरी कारकिर्द निराशाजनक ठरली. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची टीम सपशेल अपयशी ठरली. पहिल्यांदाच T20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या अमेरिकेनंही बाबरच्या पाकिस्तानचा पराभव केला होता. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: