
Sunil Gavaskar on Asia Cup : पहलगमामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Terror attack in Pahalgam's Jammu and Kashmir) भारत सरकारनं वेगवेगळे राजकीय पावलं उचलत पाकिस्तानची कोंडी केली आहे. दोन देशांमधील तणाव वाढलेला असतानच महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी मोठी मागणी केली आहे. यावर्षी आशिया कप स्पर्धेचं आयोजन झालं तर पाकिस्तानला त्यामधून बाहेर करावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आशिया कप स्पर्धा यावर्षीच्या अखेरीस होणार आहे. भारत आणि श्रीलंका हे देश या स्पर्धेचे यजमान आहेत. पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या स्पर्धेचं आयोजन अनिश्चित मानलं जात आहे. यावर्षी ही स्पर्धा झाली तर पाकिस्तानला या स्पर्धेत पाहू शकत नाही, असं गावस्कर यांनी म्हंटलं आहे.
( नक्की वाचा : India's Squad For England Tour : रोहित शर्माचं भवितव्य ठरलं! फॉर्मातील 2 खेळाडूंना जागा नाही? )
पाकिस्तान नकोच
गावस्कर यांनी 'स्पोर्ट्स टुडे' शी बोलताना सांगितलं की, 'बीसीसीआयचं धोरण हे नेहमीच भारत सरकारशी सुसंगत राहिलं आहे. आशिया कपबाबतही यामध्ये काही बदल होईल असं मला वाटत नाही. भारत आणि श्रीलंका आशिया कपचे यजमान आहेत. तोपर्यंत परिस्थिती बदलेलं का नाही यावर अवलंबून आहे. पण, परिस्थिती बदलली नाही तर मी पाकिस्तानला आशिया कपमध्ये सहभागी झालेलं पाहू शकत नाही.
( नक्की वाचा : Mumbai Indians : तळाची मुंबई इंडियन्स टॉपला कशी पोहोचली? वाचा विजयी सिक्सर्सचे 6 प्रमुख कारणं )
आशिया क्रिकेट परिषद विसर्जित केली जाऊ शकते, असा अंदाज देखील गावस्करांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. 'हे कसं होईल मला माहिती नाही. कदाचित आशिया क्रिकेट परिषद विसर्जित केली जाऊ शकते. तीन किंवा चार देशांमध्येही ही स्पर्धा होईल. त्यामध्ये हाँगकाँग आणि युएईला आमंत्रित केले जाऊ शकते. पुढील काही महिन्यांनध्ये या गोष्टी स्पष्ट होतील,' असं गावस्कर म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world