जाहिरात

Paris Olympics 2024: 46 सेकंदाचा 'रक्तरंजित खेळ' महिला बॉक्सरची झाली 'पुरुषा'शी लढत

Paris Olympics 2024: इटलीची एंजला कारिनी ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात वादग्रस्त लढतीमध्ये फक्त 46 सेकंदामध्ये पराभूत झाली.

Paris Olympics 2024: 46 सेकंदाचा 'रक्तरंजित खेळ' महिला बॉक्सरची झाली 'पुरुषा'शी लढत
Paris Olympics 2024: महिला बॉक्सरचा झाला 'पुरुषा' शी सामना
मुंबई:

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सतत नव्या कारणांमुळे वाद होत आहेत. सुरुवातीला सीन नदीच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर खेळाडूंना जेवण्यासाठी त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार होती. आता गुरुवारी एक भयंकर प्रकार या ऑलिम्पिकमध्ये दिसला. इटलीच्या एंजला कारिनीला 'बायलॉजिकल मेल' समजल्या जाणाऱ्या एका बॉक्सरनं ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात वादग्रस्त लढतीमध्ये फक्त 46 सेकंदामध्ये पराभूत केलं. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

इटलीची एंजेला कारिनी आणि अल्जेरियन बॉक्सर इमान खेलीफ यांच्यातील मॅच फक्त 46 सेकंद झाली. त्यानंतर एंजेलानं मॅच सोडली. एंजेला तिचं हेल्मेट फेकून रिंगच्या आतमध्येच रडत होती. ही मॅच रद्द करण्यात आली त्यानंतर 'हा अन्याय' असल्याचं एंजेलानं सांगितलं.

25 वर्षांच्या एंजेलानं अल्जेरियाच्या बॉक्सरशी हस्तांदोलन करण्यासही नकार दिला. इमाने खेलीफच्या दोन पंचनंतरच एंजेला रडत रिंगच्या बाहेर गेली. विशेष म्हणजे इमान खेलीफला ऑलिम्पिकपूर्वी एक प्रमुख बॉक्सिंग स्पर्धेत खेळण्यास बंदी घातली होती. 

( नक्की वाचा : पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन कार्यक्रमावर कंगना रनौत का संतापली? )
 

का सुरु झाला वाद?

महिलांच्या 66 किलो वजनी गटात इटलीची एंजेला कारिनी आणि अल्जेरियन बॉक्सर इमाने खेलीफ यांच्यातील लढतीला एक पुरुष विरुद्ध महिला यांच्यातील लढत म्हंटलं जात आहे. इमाने खेलीफ यापूर्वी देखील स्वत:च्या जेंडरबाबत वादात सापडली आहे. लिंग योग्य सिद्ध करण्यासाठी घेण्यात आलेल्या टेस्टोस्टेरोन चाचणीत अयशस्वी झाल्यानंतर खेलिफला गेल्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतून वगळण्यात आलं होतं. 

46 सेंकंदानी एंजेलानं मॅच थांबवली. त्यावेळी रेफ्रीनं इमानेचा हात उंचावून विजेता जाहीर केली. त्यावेळी एंजेलाच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. तिनं रेफ्रीच्या हातातून स्वत:चा हात हिसकावून घेतला आणि रागानं बॉक्सिंग रिंगच्या बाहेर निघून गेली. 

इटलीची एंजेला कारिनी त्यानंतर गुडघ्यावर बसून रडू लागली. मी यापूर्वी कोणत्याही बॉक्सिंग स्पर्धेत इतके मजबूत प्रहार सहन केले नव्हते. मला त्रास सहन करण्याची सवय आहे. पण, मी या पद्धतीचे ठेसे कधीही खाल्ले नाहीत. ही मॅच सुरु ठेवणं अशक्य होतं. हे अवैध आहे, असं सांगणारी मी कुणीच नाही.' असं एंजेलानं सांगितलं. 

( नक्की वाचा : Paris Olympic : धक्कादायक वर्तनामुळे या सुंदर ऑलिम्पिकपटूला घरी पाठवले )
 

मी खेळण्यासाठी रिंगमध्ये उतरले होते. मला पहिल्या मिनिटामध्येच तसं काही वाटलंच नाही. माझं नाक खूप दुखत होतं. मी हार मानली नाही. पण, एका ठोश्यानंतर खूप त्रास होऊ लागला. त्यामुळे मी सामना सोडण्याचा निर्णय घेतला. मी ताठ मानेनं जात आहे,' असं एंजेलानं सांगितलं.  

बॉक्सिंगच्या एका सामन्यात 3 मिनिटांचे तीन राऊंड असतात. पण, अल्जेरियाच्या बॉक्सरनं दोन जोरदार ठोसे लगावले आणि एलेनानं फक्त 46 सेकंदामध्ये बाहेर काढलं. नाकाला दुखापत झाल्यानं तसंच रक्त येत असल्यानं इटलीची बॉक्सर उभं राहू शकत नव्हती.  

आयोजकांनी काय सांगितलं?

ऑलिम्पिक समितीनं या विषयावर त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. IOC चे प्रवक्ते मार्क एडम्सनं पत्रकारांना सांगितलं की, 'महिला वर्गात सहभागी झालेले सर्व प्रतिस्पर्धी स्पर्धेच्या नियमांचं पालन करत आहेत. ते पुढे म्हणाले की, इमानेनं तिच्या पासपोर्टनुसार महिला आहे. ती महिला असल्याचं पासपोर्टमध्ये लिहिलं आहे.'
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
Paris Olympic: स्वप्नील कुसाळेच्या स्वागताचा प्लॅन ठरला, सरकारने जाहीर केले 1 कोटींचे बक्षिस
Paris Olympics 2024: 46 सेकंदाचा 'रक्तरंजित खेळ' महिला बॉक्सरची झाली 'पुरुषा'शी लढत
Paris Olympic 2024 Indian hockey team won 3-2 against Australia after 52 years
Next Article
Paris Olympic 2024 : भारतीय हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी; 52 वर्षांनी ऑस्ट्रेलियावर मात