
Dwarkanath Sanzgiri passed away : क्रिकेट समीक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध नाव द्वारकानाथ संझगिरी यांचं वयाच्या 74 व्या वर्षी निधन झालं आहे. क्रिकेट समीक्षण क्षेत्रात त्यांचा नावाचा मोठा दबदबा होता. द्वारकानाथ संझगिरी यांनी 1983 पासून ते आजपर्यंतचे सर्व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक (Sports News) देखील कव्हर केले आहेत. प्रमुख माध्यमांसह पुस्तकांच्या माध्यमातून द्वारकानाथ संझगिरी यांनी क्रीडा विषय सर्वसामान्यांना समजावून सांगितला. क्रिकेट विश्लेषक आणि तज्ज्ञ म्हणूनही ते विविध टीव्ही चॅनेल्सवर नियमितपणे दिसत होते. क्रीडा क्षेत्राबरोबरच चित्रपटांचाही त्यांचा दांडगा अभ्यास होता. चित्रपटाविषयी त्यांनी अनेक पुस्तकंही लिहिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
द्वारकानाथ संझगिरी यांचा जन्म मुंबईत दादर येथील हिंदू कॉलनीत झाला. त्यांचं शालेय शिक्षण किंग्ज जॉर्ज तर महाविद्यालयीन शिक्षण रामनारायण रुईयामध्ये झालं. यानंतर व्हीजेटीआयमधून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. क्रीडा क्षेत्रातील समीक्षणाबरोबरच संझगिरी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून नोकरी केली. 2008 मध्ये ते मुख्य अभियंता आणि त्यानंतर पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून सेवानिवृत्त झाले. नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धापासून संझगिरी एकपात्री स्टँडअप टॉक शो करत आहेत आणि त्यांनी आजपर्यंत हजाराहून अधिक असे कार्यक्रम केले आहेत.
नक्की वाचा - Sachin Tendulkar: लक्ष्मणमुळे सचिनला मिळाला होता ओरडा, 'तो' किस्सा सचिनने जसाच्या तसा सांगितला
द्वारकानाथ संझगिरी यांनी लिहिलेली पुस्तके
शतकात एकच - सचिन
चिरंजीव सचिन
दिलखुलास बातचीत क्रिकेटपटूंशी
खेलंदाजी
बोलंदाजी
चॅम्पियन्स
चित्तवेधक विश्वचषक 2003
क्रिकेट कॉकटेल
क्रिकेट वर्ल्ड कप हायलाईट्स
कथा विश्वचषकाच्या
लंडन ऑलिम्पिक
पॉवर प्ले
स्टंप व्हिजन
संवाद लिजंड्सशी
स्टंप व्हिजन/क्रिकेट गाथा
थर्ड अंपायर
इंग्लिश ब्रेकफास्ट
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world