
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने उबर मोटो (Uber Moto) विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. RCB ने आरोप केला आहे की Uber ने त्यांच्या YouTube च्या जाहिरातीत त्याच्या ट्रेडमार्कचा अनादर केला आहे. ज्यामध्ये क्रिकेटर ट्रॅव्हिस हेड आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ट्रॅव्हिस हेड इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) कडून खेळत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने आरोप केला आहे की, उबरच्या जाहिरातीमध्ये त्यांच्या लोकप्रिय ट्रेडमार्कचा गैरवापर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची प्रतिमा मलीन झाली आहे. 5 एप्रिल रोजी उबरने एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात सनरायझर्स हैदराबादचा स्टार खेळाडू ट्रॅव्हिस हेड दाखवण्यात आला होता. ही जाहिरात उबर मोटो बाइक टॅक्सी सर्व्हिसचा प्रचार करण्यासाठी होती, ज्याचे नाव 'हैदराबादी' मोहीम आहे.
यामध्ये ट्रॅव्हिस हेडला बंगळुरूच्या स्टेडियममध्ये प्रवेश करताना दाखवण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये, हेड एका साइनबोर्डवरील मेसेज 'बंगलोर विरुद्ध हैदराबाद' वरून 'रॉयली चॅलेंज्ड बेंगळुरू' असा बदलतो. त्यानंतर सिक्युरिटीने पाहताच तो उबेर मोटो बाईकवरून वेगाने पळून जातो. ही जाहिरात काही वेळातच यूट्यूबवर लोकप्रिय झाली. तर तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलही झाला. रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या म्हणण्यानुसार, जाहिरातीमध्ये आरसीबीला 'रॉयली चॅलेंज्ड बेंगळुरू' असे संबोधण्यात आले आहे.
उबरने काय बाजू मांडली?
जाहिरात केवळ विनोदी पद्धतीने करण्यात आल्याचा युक्तिवाद उबरने केला. कंपनीच्या म्हणण्यानुसार, बेंगळुरूच्या ट्रॅफिक समस्येवर प्रकाश टाकणे आणि उबर मोटोला वेगवान पर्याय म्हणून दाखवणे हा यामागचा उद्देश होता. उबेरने असा युक्तिवाद केला की जाहिरातीमध्ये थेट RCB चे ट्रेडमार्क वापरलेले नसून तो एक विनोद आहे. 13 मे रोजी होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आरसीबीला 'रॉयली चॅलेन्ज्ड आव्हान' देईल हे दाखवण्याचा उद्देश होता. सर्जनशील स्वातंत्र्याला अडथळा आणू नये, असे उबरने न्यायालयाला सांगितले. ही जाहिरात 10 दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली असून ती आता काढून टाकणे योग्य होणार नाही, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world