जाहिरात
Story ProgressBack

रोहित शर्मानं वाढदिवशी जिंकलं सर्वांचं मन, दिव्यांग फॅनची पूर्ण केली इच्छा, Video

Rohit Sharma Birthday : रोहित शर्मानं त्याच्या वाढदिवशी माणुसकी जपणारी एक कृती केलीय. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

Read Time: 2 mins
रोहित शर्मानं वाढदिवशी जिंकलं सर्वांचं मन, दिव्यांग फॅनची पूर्ण केली इच्छा, Video
Rohit Sharma Birthday रोहित शर्माचा मंगळवारी 37 वा वाढदिवस आहे.
लखनौ:

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माचा आज (30 एप्रिल) वाढदिवस (Rohit Sharma Birthday) आहे. रोहितच्या वाढदिवशीच आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2024) भारतीय टीमची घोषणा झालीय. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत जून महिन्यात ही स्पर्धा होणार आहे. भारतामध्ये मागच्या वर्षी झालेला वन-डे वर्ल्ड कप रोहितच्या हातातून थोडक्यात निसटला होता. त्या निराशेनंतर ही स्पर्धा जिंकणं रोहितसाठी महत्त्वाचं आहे. 

आयपीएल 2024 मध्ये रोहितच्या वाढदिवशी मुंबई इंडियन्सचा सामना  लखनौ सुपर जायंट्सशी होतोय. मुंबईची या सिझनमधील कामगिरी साधारण झालीय.  9 पैकी फक्त 3 सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे. आता प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी उर्वरित पाचही सामने मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वाचे आहेत. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वर्ल्ड कपमधील टीम इंडियाची निवड तसंच आयपीएलचा सामना या भरगच्च वेळापत्रकातही रोहित शर्मानं त्याच्या वाढदिवशी माणुसकी जपणारी एक कृती केलीय. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. मुंबई इंडियन्सनं त्यांच्या अधिकृत X हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट केलाय.

या व्हिडिओत सुरुवातीला सूर्यकुमार यादव व्हिलचेअरवर बसलेल्या एका दिव्यांग फॅनशी बोलताना आणि त्याच्यासाठी जर्सीवर स्वाक्षरी करताना दिसत आहे. त्यावेळी त्या फॅननं रोहितला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्याची इच्छा रोहितला समजताच हिटमॅन स्वत:हून त्याच्या जवळ गेला. रोहितनं त्याच्या जर्सीवर स्वाक्षरी दिली. तसंच त्याच्यासोबत फोटोही काढला. 

( नक्की वाचा : टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया जाहीर, रोहितसह 'हे' 15 करणार स्वप्नपूर्ती )
 

रोहित वाढदिवशी मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना विजयाचं गिफ्ट देणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे. त्यापूर्वीच त्यानं या दिव्यांग फॅनला आयुष्यभर लक्षात राहणारी भेट दिलीय. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
T20 वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न भंगलं, KL राहुलसह 5 जणांची निराशा
रोहित शर्मानं वाढदिवशी जिंकलं सर्वांचं मन, दिव्यांग फॅनची पूर्ण केली इच्छा, Video
Australia squad for T20 World cup 2024 Steve Smith Delhi capitals star left out
Next Article
T20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियन टीम जाहीर, दिग्गज खेळाडूला वगळलं
;