
Rohit Sharma VIDEO: टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा वेगवेगळ्या कारणाने सातत्याने चर्चेत आहेत. दरम्यान रोहितचा क्रिकेटच्या मैदानाबाहेरील व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात शिवाजी पार्कवर रोहित शर्मा कसून सराव करताना दिसला. तिथे त्याची भेट घेण्यासाठी आलेल्या एका चिमुकल्या चाहत्याला सुरक्षा रक्षकांनी अडवले. हे पाहून 'हिटमॅन' रोहित शर्माचा पारा चढला आणि त्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त केला.
शिवाजी पार्कवर सराव संपवून रोहित शर्मा मैदानाबाहेर पडत असताना, एका लहान चाहत्याने त्याला भेटण्याची उत्सुकता दाखवली. तो रोहितच्या दिशेने धावत आला. मात्र, तो 'हिटमॅन'पर्यंत पोहोचण्यापूर्वीच रोहितच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या मुलाला थांबवले.
लहान चाहत्याला अडवल्याचे पाहताच रोहित शर्माचा पारा चढला. त्याने जोरात ओरडून सुरक्षा कर्मचाऱ्यांवर आपला राग व्यक्त केला. चिमुकल्या चाहत्याला आपल्याजवळ येऊ देण्याची परवानगी दिली. 'उसे आने दो!' असं रोहित जोरात ओरडला.
VIDEO
— Ro³ (@45__rohan) October 10, 2025
(नक्की वाचा- धोनी दिसताच लिटल शिष्य धावत आला, चिमुकल्या खेळाडूनं स्टेडियममध्ये जे केलं..माहीलाही अभिमान वाटला! Video बघाच)
रोहित शर्माचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रोहित शर्माचा आपल्या चाहत्यांसाठी असलेला हा आदर आणि नम्रता पाहून प्रत्येक जण त्याचे कौतुक करत आहे. इन्स्टाग्रामवर एका चाहत्याने लिहिले आहे, "तो आपल्या चाहत्यांप्रति किती विनम्र आहे." तर दुसऱ्या चाहत्याने प्रतिक्रिया दिली आहे, "प्रार्थना आहे की 'हिटमॅन'च्या बॅटमधून ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक मोठा स्कोर निघावा!" आणखी एका चाहत्याने म्हटलं की,, "वाटतंय की 150+ वाली खेळी लवकरच येणार आहे."
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सज्ज
रोहित शर्माचा हा सराव आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या तयारीचा भाग आहे. भारतीय संघ लवकरच ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय (ODI) तर पाच सामन्यांची टी20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जाणार आहे.
रोहित शर्माची एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. क्रिकेटप्रेमींना आशा आहे की, या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हिटमॅन' शर्मा आपल्या जुना रंगात दिसेल आणि चौके-षटकारांची जोरदार बरसात करेल. शिवाजी पार्कवर सराव करून त्याने आपली तयारी सुरू केल्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world