
Saaniya Chandok with Tendulkar Family : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा नुकताच झाला आहे. अर्जुनचा उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंडोकबरोबर साखरपुडा झालाय. अर्जुन देखील सचिनप्रमाणेच क्रिकेटपटू आहे. तो सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वत:ची छाप पाडण्यासाठी प्रयत्न करतोय.
अर्जुन तेंडुलकर क्रिकेट करिअरमध्ये व्यस्त असताना त्याची बहीण सारानं तिच्या करिअरमध्ये एक पाऊल पुढे टाकले आहे. सचिननं शुक्रवारी सोशल मीडियावर ही माहिती दिली. सचिननं मुलगी साराच्या Pilates स्टुडिओच्या उद्घाटन सोहळ्याचे काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये अर्जुन दिसला नसला तरी, 'मास्टर ब्लास्टर' सचिनने शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये त्याची होणारी पत्नी सानिया दिसली. साराची आई अंजली तेंडुलकर देखील या रिबन-कटिंग कार्यक्रमाला उपस्थित होत्या. मुलीच्या प्रगतीचा आनंद सचिन आणि अंजलीच्या चेहऱ्यावर यावेळी दिसत होता.
( नक्की वाचा : Saaniya Chandhok : होणाऱ्या सुनबाईसोबत दिसला सचिन तेंडुलकर, फोटो आणि व्हिडिओ Viral )
सचिननं केलं लेकीचं कौतुक
सचिन तेंडुलकरनं सोशल मीडिया नेटवर्क X वर ट्विट करत त्याचा आनंद सर्वांशी शेअर केला. सचिन या ट्विटमध्ये म्हणाला की, "एक पालक म्हणून, तुम्हाला नेहमीच आशा असते की तुमच्या मुलांना अशी एखादी गोष्ट सापडेल जी त्यांना खऱ्या अर्थाने करायला आवडेल. साराने Pilates स्टुडिओ सुरू केलेला पाहणे हा आमच्यासाठी ऱ्हदयस्पर्शी क्षण आहे. तिने हा प्रवास तिच्या स्वतःच्या मेहनतीने आणि विश्वासाने, एक एक वीट जोडून उभारला आहे. सारा, आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. तू सुरू करत असलेल्या या नवीन प्रवासासाठी खूप खूप अभिनंदन,"
As a parent, you always hope your children find something they truly love doing. Watching Sara open a Pilates studio has been one of those moments that fills our hearts.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 22, 2025
She has built this journey with her own hard work and belief, brick by brick.
Nutrition and movement have… pic.twitter.com/lpRYj6mXer
सानिया चंडोक कोण आहे?
सानिया ही मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची नात असल्याचे म्हटले जाते. घई कुटुंब त्यांच्या हॉस्पिटॅलिटी आणि खाद्य उद्योगातील सेवांसाठी प्रसिद्ध आहे. ते इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरीशी संबंधित आहेत. काही दिवसांपूर्वीच, अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा खासगी कार्यक्रमात झाला. या कार्यक्रमाला दोन्ही कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होत्या.
सानिया पाळीव प्राण्यांच्या संगोपन उद्योगाशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. ती मुंबईतील 'Mr. Paws Pet Spa & Store LLP' या प्रीमियम पेट ग्रूमिंग आणि रिटेल ब्रँडची संस्थापक आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world