
Who Is Saaniya Chandhok: क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी क्रिकेटमुळे नाही, तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एका महत्त्वाच्या घटनेमुळे. अर्जुनचा मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांच्या नातीसोबत, सानिया चंडोक सोबत साखरपुडा झाला आहे. या बातमीमुळे सचिनच्या चाहत्यांमध्ये एकच उत्सुकता निर्माण झाली आहे. सचिन तेंडुलकर याचे चाहते सानियाबद्दल आणि तिच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
( नक्की वाचा: लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, शोएब अख्तरनं काढली हेड कोचची लायकी! )
सानिया चंडोकने कुठून पूर्ण केलं आहे शिक्षण?
सानिया चंडोक ही पेट इंडस्ट्रीमधील एक यशस्वी उद्योजिका आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून बिझनेस मॅनेजमेंटची पदवी घेतल्यानंतर, तिला पाळीव प्राण्यांची आवड असून शिक्षणानंतर तिने आपली आवड व्यवसायात बदलण्याचा निर्णय घेतला. तिने Mr. Paws Pet Spa & Store LLP नावाने एक आलिशान पेट स्पा सुरू केला आहे, जिथे पाळीव प्राण्यांना विशेष सेवा दिल्या जातात. या स्पाची वार्षिक कमाई सुमारे 90 लाख रुपये आहे. या स्पाचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथे पाळीव प्राण्यांना कोरियन आणि जपानी थेरपी दिली जाते, ज्यामुळे मुंबईत या स्पाचे मोठे नाव आहे.
सानिया चंडोकच्या आजोबांचा व्यवसाय नेमका काय आहे ?
सानियाचे वडील गौरव घई आणि तिचे आजोबा रवी घई यांच्यात कौटुंबिक वाद सुरू असले तरी, त्यांचे कुटुंब मुंबईतील एका मोठ्या व्यावसायिक घराण्यांपैकी आहे. रवी घई यांचा ग्रेविस ग्रुप खाद्य आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात कार्यरत आहे, ज्याचा व्यवसाय 600 कोटींहून अधिक आहे. Brooklyn Creamery आणि Baskin-Robbins India सारख्या प्रसिद्ध ब्रँडचे संचालन याच ग्रुपद्वारे केले जाते. त्याचप्रमाणे मुंबईत त्यांचे इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलही आहे.
( नक्की वाचा: बडे उद्योगपती... कोण आहेत सचिनचे होणारे व्याही रवी घई? वाचा सर्व माहिती )
सानिया आणि सारा आहेत चांगल्या मैत्रिणी
अर्जुन आणि सानिया यांची ओळख खूप जुनी आहे. अर्जुनची बहीण सारा तेंडुलकर आणि सानिया यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. सारानेच अर्जुनची ओळख सानियासोबत करून दिली होती, आणि आता हीच मैत्री प्रेमात परावर्तित आहे. अर्जुन तेंडुलकर हा क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी अजूनही झगडतो आहे. क्रिकेटमध्ये आपले नाव व्हावे, अधिक वाव मिळावा यासाठी त्याने मुंबई सोडून गोवा संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे. तो IPL मध्येही खेळला आहे, परंतु त्याला फारसे यश मिळालेले नाही. अर्जुन आणि सानिया यांच्या नात्याची सुरुवात अर्जुनची बहीण सारा तेंडुलकर हिच्यामुळे झाली. सारा आणि सानिया यांची मैत्री खूप जुनी आहे. या मैत्रीमुळेच अर्जुन आणि सानिया यांच्यातील प्रेम फुलले आणि आता ते विवाहबंधनात अडकणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world