जाहिरात

Champions Trophy 2025 : सूर्या ते संजू चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याचं 4 खेळाडूंचं स्वप्न भंग

Champions Trophy 2025 Team India Squad:  आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय टीमची घोषणा झाली आहे.तब्बल 8 वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत खेळण्याचं स्वप्न कोणत्या प्रमुख खेळाडूंचं पूर्ण झालं नाही, हे पाहूया

Champions Trophy 2025 : सूर्या ते संजू चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याचं 4 खेळाडूंचं स्वप्न भंग
मुंबई:

Champions Trophy 2025 Team India Squad:  आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय टीमची घोषणा झाली आहे. रोहित शर्मा या टीमचा कॅप्टन आहे. मोहम्मद शमी आणि श्रेयस अय्यर यांनी या टीममध्ये पुनरागमन केलंय. त्याचबरोबर यशस्वी जैस्वाल आणि अर्शदीपचाही समावेश करण्यात आलाय. पण, काही खेळाडूंना निराशा सहन करावी लागली आहे. त्यामध्ये T20 टीमचा कॅप्टन सूर्यकुमार यादवचाही समावेश आहे. तब्बल 8 वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत खेळण्याचं स्वप्न कोणत्या प्रमुख खेळाडूंचं पूर्ण झालं नाही, हे पाहूया

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सूर्यकुमार यादव

टीम इंडियाच्या T20 टीमचा कॅप्टन असलेल्या सूर्यकुमार यादवला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी संधी मिळालेली नाही. अर्थात ही आश्चर्यकारक गोष्ट नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे फॉर्मेटमध्ये होणार आहे. या प्रकारात सूर्याची कामगिरी साधारण आहे. वन-डे वर्ल्ड कप 2023 मध्ये त्यानं सपशेल निराशा केली होती.

संजू सॅमसन

टीम इंडियाचा स्टार विकेट किपर संजू सॅमसनही टीममध्ये जागा मिळवण्यात अपयशी ठरला  आहे. संजूसाठी 2023 हे वर्ष चांगलं गेलं होता. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच कॅलेंडर वर्षात तीन सेंच्युरी झळकावणारा तो पहिला भारतीय बनला. पण, त्यानंतरही वन-डे टीममध्ये त्याला संधी मिळण्यात अपयश आलं. 

( नक्की वाचा : Sanju Samson : दमदार कामगिरीनंतरही संजू सॅमसन अडचणीत! BCCI करणार 'या' निर्णयाची चौकशी )

मोहम्मद शमी

टीम इंडियाचा मुख्य बॉलर मोहम्मद सिराजचाही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी समावेश करण्यात आला नाही. नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजमध्ये सिराज जसप्रीत बुमराहचा प्रमुख सहकारी होता. पण, त्याच्या कामगिरीत सातत्याचा अभाव होता. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सिराज ऐवजी अर्शदीप सिंगवर निवड समितीनं विश्वास दाखवला आहे.

नितीश कुमार रेड्डी

टीम इंडियाचा उगवता ऑल राऊंडर नितीश कुमार रेड्डीलाही निराशा सहन करावी लागली आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये चांगला खेळत करत नितीशनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. त्यामुळे त्याचा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीममध्ये समावेश होईल, असं मत अनेक क्रिकेट एक्स्पर्टनी व्यक्त केलं होतं. पण, निवड समितीनं अनुभवी खेळाडूंवरच विश्वास दाखवला आहे. 

( नक्की वाचा : Wankhede Stadium 'तुम्ही घाटी लोक...' मराठी माणसाच्या अपमानातून उभं राहिलं मुंबईचं वानखेडे स्टेडियम )

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल (व्हाईस कॅप्टन), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: