India vs Bangladesh Test : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात कानपूरमध्ये सुरु असलेली टेस्ट टीम इंडियानं 7 विकेट्सनं जिंकली आहे. कानपूर टेस्टच्या पहिल्या दिवशी पावसामुळे पूर्ण खेल होऊ शकला नव्हता. त्यानंतर दुसरा संपूर्ण दिवस पावसामुळे वाया गेला. तिसऱ्या दिवशीही मैदान ओलं असल्यामुळे खेळ होऊ शकला नाही. त्यावेळी ही टेस्ट ड्रॉ होईल असाच सर्वांचा अंदाज होता. पण, भारतीय टीमनं सकारात्मक खेळ करत हा विजय खेचून आणला. या विजयासोबतच भारतानं दोन टेस्टची ही सीरिज 2-0 अशा फरकानं जिंकली. या विजयाबरोबरच वर्ल्ड टेस्ट सीरिज चॅम्पियनशिप फायनलच्या (WTC Final) दिशेनं टीम इंडियानं मजबूत पाऊल टाकलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाचव्या दिवशी जडेजा-बुमराहची कमाल
टीम इंडियाचा अनुभवी ऑफ स्पिनर आर. अश्विननं चौथ्या दिवशी दोन विकेट्स घेत बांगलादेशला बॅकफुटवर ढकललं होतं. पाचव्या दिवशी सकाळी अश्विननं मोमिनुल हकला आऊट करत भारताला महत्त्वाचं यश मिळवून दिलं. हकनं पहिल्या इनिंगमध्ये सेंच्युरी करणारा हक दुसऱ्या इनिंगमध्ये फक्त 2 रन काढून आऊट झाला.
Breakfast ❌ Breakthrough ✅
— JioCinema (@JioCinema) October 1, 2024
Ashwin's sorcery sees Mominul dismissed at last in the 2nd #INDvBAN Test! 🏏#IDFCFirstBankTestSeries #JioCinemaSports pic.twitter.com/Q6NXfmO2d8
अश्विननंतर रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह या अनुभवी बॉलर्सनी नियमित अंतरानं विकेट्स घेत बांगलादेशला मॅच वाचवण्याची संधी दिली नाही. जडेजा आणि बुमराह यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. बांगलादेशची दुसरी इनिंग 146 रनवर संपुष्टात आली.
( नक्की वाचा : IND vs BAN : 147 वर्षांमध्ये कुणालाही जमलं नाही ते रोहित-यशस्वीनं केलं! )
भारतीय क्रिकेट टीमसमोर विजयासाठी 95 रनचं टार्गेट होतं. भारतानं हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारताकडून दुसऱ्या इनिंगमध्ये यशस्वी जैस्वालनं सर्वाधिक 51 रन केले. बांगलादेशच्या क्रिकेट टीमनं भारतामध्ये येण्यापूर्वी पाकिस्तानविरुद्धची टेस्ट सीरिज 2-0 या फरकानं जिंकली होती. त्यानंतर भारताविरुद्धही तसाच खेळ करण्याची गर्जना बांगलादेशचा कॅप्टन नजमुल हसन शांतोनं केली होती. पण, दोन्ही टेस्ट सहज जिंकत टीम इंडियानं बांगलादेशला त्यांची जागा दाखवून दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world