Varun Aaron Retirement: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज वरुण अॅरॉनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वरुणने 2011 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली पदार्पण केले होते. भारतासाठी त्याने 9 वनडे आणि 9 कसोटी सामने खेळले आहेत.
वरुन अॅरॉनच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 29 विकेट आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वरुन वारंवार दुखापतींमुळे बराच वेळ संघाबाहेरच होता. 2010-11 मध्ये खेळल्या गेलेल्या विजय हजारे ट्रॉफीदरम्यान वरुण चर्चेत आला होता. वरुनने ताशी 153 किलोमीटर वेगाने चेंडू फेकून सर्वांच लक्ष वेधलं होतं.
(नक्की वाचा- घटस्फोटाच्या चर्चेत Yuzvendra Chahal च्या पोस्टमधून भविष्याचे संकेत! म्हणाला, खरं असेल किंवा..)
टीम इंडियात पदार्पण केल्यानंतर संघातील वेगवान गोलंदाज अशी वरुणची ओळख बनली होती. मात्र, वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे त्याच्या करिअरला ब्रेक लागला. टीम इंडियासाठी एकूण 9 एकदिवसीय सामन्यात त्याने 11 विकेट घेतल्या. तर कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 18 विकेट घेतल्या.
टीम इंडियातून बाहेर असताना वरुणने झारखंडसाठी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. वरुणने एकूण 66 प्रथम श्रेणी सामने खेळले आणि यात त्याने 173 विकेट घेतल्या. तर, लिस्ट-ए क्रिकेटमध्ये वरुणने 87 सामन्यांत 141 विकेट घेतल्या आहेत. वरुणने टी-20 क्रिकेटमध्ये 95 सामने खेळले आणि एकूण 93 विकेट घेतल्या आहेत.
( नक्की वाचा : Yuzvendra Chahal च्या मनात काय सुरु आहे? घटस्फोटाच्या चर्चेत नव्या पोस्टचा अर्थ काय? )
आयपीएल कारकीर्द
वरुणने आयपीएलमध्येही अनेक सामने खेळले. 2011 मध्ये त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने एकूण 52 सामन्यांमध्ये 44 विकेट घेतल्या. मात्र, 2022 नंतर वरुणला आयपीएलमध्ये संधीच मिळाली नाही. आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्ससह अनेक मोठ्या संघांकडून खेळताना दिसला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world