![Champions Trophy 2025 : टीम इंडियात होणार मोठा बदल! बुमराहवर संभ्रम, 2 जणांची नावं आघाडीवर Champions Trophy 2025 : टीम इंडियात होणार मोठा बदल! बुमराहवर संभ्रम, 2 जणांची नावं आघाडीवर](https://c.ndtvimg.com/2025-02/4tet3mlg_jasprit-bumrah_625x300_04_February_25.jpg?im=FeatureCrop,algorithm=dnn,width=773,height=435)
India Champions Trophy 2025 squad: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी निवडण्यात आलेल्या टीम फायनल करण्याची वेळ आता आली आहे. 19 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेसाठी 15 सदस्यांची अंतिम टीम निवडण्याची मुदत मंगळवार, 11 फेब्रुवारी आहे. टीम इंडिया या स्पर्धेच्या विजतेपदाची प्रबळ दावेदार आहे. पण, टीमचा प्रमुख बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) बाबत संभ्रम आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बुमराहबाबत बीसीसीआय लवकरच निर्णय जाहीर करेल. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या मॅचपूर्वी जरी बुमराह फिट झाला तरी तो टीम इंडियामध्ये असेल, असं मानलं जात आहे. पण, बुमराह फिट होण्याची खात्री नसेल तर त्याच्या जागेवर नव्या खेळाडूची निवड होऊ शकते. त्यासाठी दोन खेळाडूंची नावं चर्चेत आहेत.
टीम इंडियात बदल झाला तर सर्वात प्रथम वरुण चक्रवर्तीच्या (Varun Chakaravarthy) नावाचा विचार होऊ शकतो. वरुणनं इंग्लंड विरुद्ध झालेल्या T20 सीरिजमध्ये 14 विकेट्स घेतल्या होत्या. त्याबद्दल त्याला 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. वरुणची मिस्ट्री बॉलिंग टीम इंडियासाठी उपयोगी ठरु शकते. त्याचा विचार करुनच इंग्लंडविरुद्धच्या वन-डे टीममध्येही त्याची निवड करण्यात आली. आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अंतिम 15 जणांमध्ये वरुणची एन्ट्री होऊ शकते.
( नक्की वाचा : IND vs ENG सिनेमा पाहात होतो त्यावेळी... श्रेयस अय्यरच्या खुलाशानंतर रोहित आणि गंभीरवर होतीय टीका! )
बुमराह फिट नसेल तर हर्षित राणाची (Harshit Rana) निवड होण्याची शक्यता आहे. कोच गौतम गंभीरचा तो विश्वासू खेळाडू आहे. गंभीर कोच झाल्यानंतरच त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तीन्ही प्रकारात पदार्पण करण्याची संधी मिळाली. इंग्लंडविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्येही त्याची बुमराहचा बदली खेळाडू म्हणून निवड झाली. आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी देखील हा ट्रेंड कायम राहू शकतो.
कुलदीप-सुंदरचं काय होणार?
वॉशिंग्टन सुंदरची चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीममध्ये निवड झाली आहे. पण, त्याला इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन वन-डेमध्ये संधी मिळाली नाही. सुंदरच्या जागेवर अक्षर पटेलला संधी दिली असून त्यानं दमदार कामगिरी केलीय. कुलदीप यादव पहिली वन-डे खेळला. पण, त्यामधील साधारण कामगिरीमुळे दुसऱ्या वन-डेसाठी त्याला वगळण्यात आले होते. कुलदीपऐवजी वरुण चक्रवर्तीला संधी मिळाली. टीम फायनल करण्यापूर्वी निवड समिती कुलदीप आणि सुंदरवर पुन्हा एकदा विचार करु शकते.
( नक्की वाचा : IND vs ENG : गंभीरच्या लाडक्या शिष्यानं केली कमाल, आजवर कोणत्याही भारतीयाला जमलं नाही ते केलं! )
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहे. भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. 23 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान लढत असेल, तर न्यूझीलंडविरुद्धचा सामना 2 मार्च रोजी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल 9 मार्च रोजी खेळली जाईल.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय टीम : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (व्हाईस कॅप्टन), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world