703 कोटी; मुंबईत सर्वात महागडा फ्लॅट विकत घेणाऱ्या लीना गांधी आहेत तरी कोण? | NDTV मराठी

मुंबईतील लक्झरी रिअल इस्टेट बाजारात आणखी एक विक्रम प्रस्थापित झालाय. वरळी येथील दोन सी फेसिंग डुप्लेक्स अपार्टमेंट हे तब्बल सहाशे एकोणचाळीस कोटींना विकले गेलेत. विशेष म्हणजे हा व्यवहार भारतातला आतापर्यंतचा सर्वात महागडा रेसिडेन्शियल अपार्टमेंट विक्रीचा व्यवहार ठरलाय. एकूण बावीस हजार पाचशे बाहत्तर चौरस फूट क्षेत्रफळ असलेलं हे अपार्टमेंट वरळी सी फेस वरील नमनझ या चाळीस मजली इमारतीत आहे तर मुंबई स्थित उद्योजिका लीना गांधी यांनी हा सर्वात महागडा फ्लॅट खरेदी केलाय.

संबंधित व्हिडीओ