कल्याणमधून एक धक्कादायक बातमी आहे. कल्याणमध्ये केबी के इंटरनॅशनल स्कूल ची भिंत कोसळली आणि या दुर्घटनेमध्ये एका मुलाचा मृत्यू झालाय. दोन मुलं गंभीर जखमी आहेत. शाळेची भिंत कोसळली तेव्हा ही मुलं या परिसरात खेळत होती.