यंदाच्या आयपीएल मध्ये धडाकेबाज शतक ठोकणाऱ्या चौदा वर्षीय वैभव सूर्यवंशीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पाटणा विमानतळावर ही भेट झाली यावेळी वैभवचं कुटुंबही सोबत होतं. वैभव सूर्यवंशीीनं चालू आयपीएल सीझन मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. अवघ्या पस्तीस चेंडूमध्ये, शंभर धावांची खेळी साकारणाऱ्या वैभवनं संपूर्ण देशाचं लक्ष्य स्वतःकडे वेधलं. वैभवची शंभर धावांची खेळी पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्याचं कौतुक केलं.