Nashik| वयवर्ष 84, आजोबांनी करुन दाखवलं; संस्कृतमध्ये डिप्लोमा पूर्ण, विद्यापीठातून आले दुसरे | NDTV

शिक्षणाला वयाची अट नसते. माणूस आयुष्यभर विद्यार्थीच असतो असं म्हटलं जातं. नाशिकच्या गजपंत परिसरात राहणाऱ्या चौऱ्याऐंशी वर्षीय अमोद मेहता यांना संस्कृत शिकण्याची आवड होती आणि म्हणून त्यांनी कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठात डिप्लोमा साठी प्रवेश घेतला. दोन वर्ष अगदी पहाटे उठवून त्यांनी अभ्यास करत मेहनत घेत शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली आहे. आणि दोनच दिवसांपूर्वी निकाल लागला आणि विद्यापीठात आजोबा दुसरे आल्याचं समजताच मेहता कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला. काकांना संस्कृत विषयाची एवढी गोडी का यासह इतर प्रश्नांची उत्तर त्यांच्याकडूनच जाणून घेतली आहेत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी.

संबंधित व्हिडीओ