अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पिक विमा कंपनीला न जगवता आम्हाला अर्थात शेतकऱ्यांना जगवा अशी मागणी केलीय.क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या तर्फे हा दावा करण्यात आला असून तब्बल एक लाख शेतकऱ्यांकडून यावर्षी पिक विमा न काढण्याबाबतचे लेखी निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्याचा निर्णय घेतलाय.शेतकरी हिस्सा वगळून केंद्र व राज्य सरकारकडून विमा कंपनीला 13 हजार हेक्टरी सोयाबीन शेअर दिला जातो.मात्र यंदा पिक विमा कापणी नंतरच शेतकऱ्याला मदत मिळणार आहे.त्यामुळे सरळ हा कंपनीचा फायदा होणार असल्यामुळे एक लाख शेतकरी जिल्ह्यातून शेतकरी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पिक विमा न काढण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांना अशी पत्र पाठवणार आहेत.