अमरावतीकरांसाठी आनंदाची बातमी.अमरावती विमानतळावरून या महिन्याच्या अखेरीस विमानसेवा सुरु होणार आहे.अमरावती विमानतळाला डीजीसीएने एअरोड्रम परवाना दिलाय.. त्यामुळे विमानसेवेचा मार्ग मोकळा झालाय.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत ट्विट करत ही माहिती दिली.वाढीव हवाई कनेक्टिव्हिटी, आर्थिक वाढ, पर्यटन आणि विकासाच्या संधींच्या नवीन युगाची सुरुवात असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.या विमानतळावरून अलायन्स एअरची मुंबई-अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु होणार आहे.. सुरुवातीला आठवड्यातून तीन वेळा ही विमानसेवा असणार आहे.