पाकिस्तानमध्ये बलोच लिबरेशन आर्मीने ट्रेन हायजॅक केली असून २० पाकिस्तानी जवानांना ठार केलंय.बलुचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसला हायजॅक करण्यात आलंय.स्वंतत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी या परिसरात बलूच बिलरेशन आर्मी सक्रीय आहे.वेगळ्या बलुचिस्तानसाठी त्यांचा पाकिस्तानाविरुद्ध लढा आहे.या ऑपरेशनदरम्यान बीएलए आर्मीने ट्रेनमधील महिला, लहान मुले आणि बलूच प्रवाशांना सोडून दिले आहे.बीएलएचे फियादीन युनिट, मजिद ब्रिगेड या मिशनला लीड करत आहे.