दहा-बारा वर्षांपुर्वी राज्यात सिंचन घोटाळा गाजला होता..याच घोटाळ्याच्या मुद्द्यावरून महायुतीचं सरकार २०१४ साली सत्तेत आलं होतं. हा घोटाळा ज्या विदर्भ सिंचन विकास महामंडळात झाल्याचा आरोप होता, त्याच VIDC मध्ये आणखी एक घोटाळा समोर आला आहे. विदर्भातील 16 विविध तलावांजवळील शेकडो एकर जमीन पर्यटनाच्या नावाखाली VIDC ने भाड्याने दिली आहे. पण पर्यटनासाठी भाड्याने दिलेल्या जागेत अनेकांनी अतिक्रमण केल्याचे सध्याचं चित्र आहे. पाहुयात यावरचा विशेष रिपोर्ट