बीडमध्ये परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान केले, सोबतच लिंबागणेश-बोरखेड रस्त्यावरील पूल वाहून गेला. प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा निषेध करत संतप्त शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रतिकात्मक फोटोला दुग्धाभिषेक केला. लवकरात लवकर पूल दुरुस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.