अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यात, विशेषतः भुसावळ तालुक्यातील वांजोळा शिवारात कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने पीक कुजू लागले आहे. मात्र प्रशासनाचा एकही अधिकारी न फिरकल्याने पंचनामे प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांनी तात्काळ नुकसान भरपाईची मागणी केली आहे.