छत्रपती संभाजीनगर महापालिकेने पूरग्रस्तांना ५० लाख रुपयांची मोठी मदत केली आहे. महापालिकेतील सुमारे चार हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार एकत्रित करून हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये (CM Relief Fund) जमा करण्यात आला आहे. प्रशासक जी श्रीकांत यांनी हा निधी सुपूर्द केला.