भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील केमिकलच्या गोदामाला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एका कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय.दापोडा गावातील प्रेरणा कॉम्पलेक्समधील गोदामाला ही आग लागली.केमिकलचे गोडाऊन असल्यानं आगीनं रौद्र रूप धारण केलं. काही तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आलंय.