लिलावती रुग्णालयात काळ्या जादूचे प्रयोग होत असल्याचा आरोप करण्यात येतोय.रुग्णालयाचे विश्वस्त प्रशांत मेहता आणि चारु मेहता यांच्या कार्यालयांमध्ये हाडे, सांगाडे आणि केस सापडल्याचा आरोप करण्यात आलाय. त्याचबरोबर काळ्या जादूसाठी लागणारे साहित्यही सापडल्याचा आरोप करण्यात आलाय.रुग्णालय प्रशासनाचे कार्यकारी संचालक परमबीर सिंग यांनी हा आरोप केलाय.