Chandrapur| नांदगावमध्ये भीषण पाणीटंचाई, खड्डा करून पाणी काढलं जातंय बाहेर; नालाही कोरडा पडला

चंद्रपूरच्या नांदगावमध्ये भीषण पाणीटंचाई पहायला मिळतेय. नांदगावमधील गावकरी पाण्यासाठी पायपीट करतायत.गोंडपिंपरी तालुक्यात नांदगाव हेटी नावाचे छोटेसे गाव आहे. या गावात पाण्याची सोय नाही. एक विहीर आणि काही बोअरवेल आहेत.मात्र आता त्याही कोरड्या पडल्या. नळ योजना आहे; मात्र टाकीतच पाणी नाही.अशा स्थितीत गावकरी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या नाल्यात पाण्यासाठी जातात.. नालाही कोरडा पडला आहे. त्यात खड्डा करून पाणी बाहेर काढले जात आहे. पहाटेपासून पाण्यासाठी सुरू होणारा संघर्ष दिवसभर सुरू असतो.अबालवृद्ध सारेच पाण्यासाठी हंडे घेऊन पायपीट करतात. मागील कित्येक वर्षांपासून हे चित्र कायम आहे, पण प्रशासनाला मात्र अजूनही जाग आलेली नाही.

संबंधित व्हिडीओ