वाल्मीक कराड जेलमध्ये असलेल्या बीड शहर पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही तपासण्याची मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.बीड शहर पोलीस ठाण्यात बालाजी तांदळे प्रमाणेच इतर कोणी आलं का? अशी शंका देशमुख कुटुंबाला असल्याने या सीसीटीव्हीची मागणी करण्यात आली आहे. माहितीच्या अधिकारात म्हणजे देशमुख यांनी ही मागणी केलीय. ज्या कालावधीत वाल्मिक कराड बीड शहर पोलीस ठाण्यात होता त्या कालावधीतील सीसीटीव्हीची मागणी स्वतः धनंजय देशमुख करत आहे.