Mumbai Air Pollution | मुंबईसह उपनगरात वायू प्रदूषणाची चिंता, मनपा प्रशासन सतर्क | NDTV Marathi
Concerns over air pollution in Mumbai and its suburbs; Municipal Corporation administration on alert.
मुंबईतील वायू गुणवत्ता सध्या नियंत्रणात असली, तरी आगामी काळात प्रदूषणाची पातळी वाढू नये यासाठी महापालिकेने आतापासूनच उपाययोजना करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम राबवून रस्ते धुणे, मोठे बांधकाम व पायाभूत प्रकल्पांभोवती आवरण लावणे आदी उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी शुक्रवारी दिले. तसेच, प्रदूषण वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या मोठ्या प्रकल्पांवर देखरेख ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.