महाराष्ट्राच्या लेकीचा स्वीडनमध्ये डंका, राधाकृष्ण विखेंची पुतणी Nila Vikhe Patil स्वीडनच्या खासदार

महाराष्ट्राच्या लेकीचा स्वीडनमध्ये डंका, राधाकृष्ण विखेंची पुतणी Nila Vikhe Patil स्वीडनच्या खासदार A daughter of Maharashtra makes her mark in Sweden; Radhakrishna Vikhe's niece, Nila Vikhe Patil, becomes a Member of Parliament in Sweden. महाराष्ट्राशी मूळ संबंध असलेल्या 'ग्रीन पार्टी'च्या नेत्या नीला विखे पाटील यांची स्टॉकहोम शहरातून स्वीडनच्या संसदेवर निवड झाली आहे. स्वीडनमध्ये डाव्या विचारसरणीच्या विरोधी पक्षाला निसटते बहुमत मिळाल्यानंतर, ३४९ सदस्यसंख्या असलेल्या 'रिक्सडॅग'मध्ये (स्वीडिश संसद) नीला यांचा प्रवेश झाला आहे. स्वीडनमध्ये जन्मलेल्या ४१ वर्षीय नीला यांनी त्यांचे बालपण अहमदनगरमध्ये व्यतीत केले आणि त्यानंतर त्या स्वीडिश राजकारणात करिअर घडवण्यासाठी तिथे परतल्या. नीला या महाराष्ट्रातील शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे पाटील यांची कन्या आणि केंद्रीय मंत्री राहिलेले बाळासाहेब विखे पाटील यांची नात आहेत. तसेच, त्या महाराष्ट्राचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पुतणीही आहेत. Nila Vikhe Patil, Parliament in Sweden

संबंधित व्हिडीओ